आदल्या दिवशी महाराष्ट्र बचाओमध्ये सहभाग ; दुसऱ्या दिवशी भाजपाईंकडूनच घरात घुसून मारहाण !

आदल्या दिवशी महाराष्ट्र बचाओमध्ये सहभाग ; दुसऱ्या दिवशी भाजपाईंकडूनच घरात घुसून मारहाण !

आदल्या दिवशी महाराष्ट्र बचाओमध्ये सहभाग ; दुसऱ्या दिवशी भाजपाईंकडूनच घरात घुसून मारहाण !

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांत सरकार अपयशी ठरलंय आणि महाराष्ट्र धोक्यात आहे, या कारणाखाली भाजपाने महाराष्ट्र बचाओ आंदोलन केलं, परंतु, आपल्या राहत्या परिसर सॅनिटाईझ करतो, याचा राग धरून भाजपाचे खासदार डाॅ. भागवत कराड यांच्या मुलांनी युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याची घटना औरंगाबादेत घडलीय.

पार्टी विथ डिफरन्सेस असलेल्या भाजपाचा दुतोंडीपणा यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे पीडीत युवकाने महाराष्ट्र बचाओ आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवला होता. त्याचाही राग पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना होता.

औरंगाबादेत कोटला काॅलनीत राहणारा कुणाल नितीन मराठे हा युवक भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे. दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाचा तो सदस्य आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो भाजपात कार्यरत आहे सध्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी कुणाल कोटला कॉलनीतून इच्छुक उमेदवार आहे. याच मतदारसंघात भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन हा सुद्धा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यावरून गेल्या दोन वर्षांपासून कुणाल आणि हर्षवर्धन यांच्यात धुसफूस सुरू आहे.

कुणाल मराठे यांनी “मीडिया भारत”ला दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही गाडीच्या काचा फोडणे मोबाईलवरून निनावी धमक्या देणे असे प्रकार झालेले आहेत. परंतु पक्षांतर्गत तक्रारी करण्यापलीकडे कुणाल यांनी ते गांभीर्याने घेतलं नव्हतं. मात्र आता थेट घरात घुसून हल्ला करेपर्यंत पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांची मजल गेल्यामुळे कुणाल याने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात हल्लेखोर कराड बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे

कोविडसंसर्ग सुरू झाल्यापासून लॉकडाऊन काळात कुणाल मराठे वैयक्तिक पातळीवर आपल्या राहत्या परिसरात मदत कार्य करीत आहे; मग ते शिधावाटप असो, मास्क वाटप किंवा परिसराचं निर्जंतुकीकरण करणे असो ;

महाराष्ट्र बचाव आंदोलनातला सहभाग पार पडल्यानंतर आपल्या भागात कोविडरुग्ण सापडला हे कळल्यावर कुणाल यांनी त्याभागात सॅनिटाईझेशन करून घेतलं होतं. घरी येऊन तो जेवायला बसला होता. तोवर भागवत कराड यांची दोन मुलं हर्षवर्धन आणि वरूण हे काही गुंडांसोबत त्याच्या घरी पोहोचली.

कुणालच्या वडिलांनी दरवाजा उघडला तेव्हा “याला कितीवेळा समजावलं तरी कळत नाही काय” असं म्हणून ते घरात घुसले. घरातली बॅट सुद्धा त्यांनी कुणालला फेकून मारली. यावेळी कुणालच्या बचावात मध्ये पडलेल्या त्याच्या आई-वडिलांनाही कराड बंधूंनी धक्काबुक्की केली. हा प्रकार आपल्या जिव्हारी लागला असल्याचं कुणाल मराठे यांनी म्हटलं आहे.

डॉ. भागवत कराड हे अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. मुंडे साहेबांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते. पक्षात आणि महापालिकेत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत; परंतु त्यांच्या मुलांचा भारतीय जनता पार्टीत वावर नाही. तसंच कुठलंही राजकीय योगदान नाही. त्यामुळे त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला डावलून निवडणुकीसाठी त्यांनी दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगून कुणाल मराठे यांनी महापालिका निवडणुकीतला आपला दावा कायम असल्याचा निर्धार केला आहे.

गेले दोन महिने कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मदतकार्य करीत असून, शिधावाटप करत असताना संबंधित व्यक्तिच्या घरी आमचा कार्यकर्ता पवन सोनावणे विचारपूस करायला गेला असता, संबंधित व्यक्तिने त्याला उद्देश्यून जातीवाचक उद्गार काढले, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. आम्ही तेव्हा त्यांच्या घराबाहेर होतो व वाद सोडवण्यासाठी आत गेलो, असा खुलासा खासदार भागवत कराड यांचा मुलगा व मारहाण प्रकरणातील आरोपी हर्षवर्धन कराड याने केला आहे.

दरम्यान, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हर्षवर्धन आणि वरूण कराड या दोघांविरोधात भादंवि ४५२ व ३२४ कलमाखाली गुन्हा दाखल असून अद्यापि अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी “मिडिया भारत” ला दिली आहे.

मारहाणीची घटना आणि त्यावरील कराड यांचं स्पष्टीकरणाचा विडियो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!