रायगडाचा डिस्कोथेक करायचाय का? विद्युत रोषणाई वरून खासदार संभाजी छत्रपती नाराज !

रायगडाचा डिस्कोथेक करायचाय का? विद्युत रोषणाई वरून खासदार संभाजी छत्रपती नाराज !

रायगडाचा डिस्कोथेक करायचाय का? विद्युत रोषणाई वरून खासदार संभाजी छत्रपती नाराज !

आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रायगडावर स्वखर्चाने विद्युत रोषणाई केलीय. शिंदेंनी रायगडाचा डिस्कोथेक केलाय व हा शिवरायांचा अपमान आहे, असं मत खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केलंय. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, असं वक्तव्य खासदार संभाजी छत्रपती यांनी केलंय. या वादात शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते समाजमाध्यमात एकमेकांना भिडले आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर उपस्थित राहून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांना मानाचा मुजरा केला. यावेळी रायगडावरील श्री जगदिश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली.

महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला, तो राज दरबार व त्यासमोरील नगारखाना, वाघ दरवाजा, महादरवाजा हे सर्व पाहताना पराक्रमाच्या व स्वराज्याच्या वैभवाच्या पाऊलखुणा आजही इतिहास डोळ्यासमोर उभ्या करतात, अशी प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिलीय.

राज्य शासनाच्या रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून भारताचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करत जतन करण्याचं काम सुरु असून त्या कामाचीही खासदारांनी पाहणी केली. रायगडाचे संवर्धन हे जगातील गड-किल्ले अभ्यासकांसाठी आदर्श ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निसर्ग वादळानंतर रायगड किल्यावरील विद्युत रोषणाई कोलमडली होती. त्यानंतर पुरातत्व खात्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ही बाब शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी येथील विद्युत रोषणाईचे साहित्य स्वतः देण्याची घोषणा केली. तसंच, 19 फेब्रुवारी पूर्वी रायगड उजळला पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते.

मात्र, आता प्रत्यक्षात रोषणाई झाल्यानंतर भाजपा खासदार संभाजी छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, असं खासदार छत्रपती यांनी म्हटलं आहे.

काही शिवप्रेमींनी खासदार संभाजी छत्रपती यांचं समर्थन केलं असलं तरी काहींनी त्यांना विरोधही केला आहे. या रोषणाईत काय गैर आहे, असा सवाल शिवप्रेमींनी केला आहे.

भाजपा युवा मोर्चा देवळा तालुकाध्यक्ष दिशांत देवरे यांनी खासदार भोसलेंना घरचा आहेर दिलाय.

माफ करा, युवराज संभाजीराजे छत्रपती ! महाराज, आपला निषेधाचा सूर या रोषणाईचा बद्दलचा पटलेला नाही. ही रोषणाई डिस्को सारखी का वाटली.? महाराज आपण १४४ कलमांचा निषेध करण्या ऐवजी,पुरातत्व विभागाचा निषेध का.? कृपया १४४ बद्दल आपण बोलाल का काहीतरी..? असा सवाल देवरे यांनी खासदारांच्या ट्वीटवर उत्तरादाखल केलाय.

मी काही तुमच्यासारखा राजकारणी नाही ; पण माझ्या शिवरायांचा भक्त आहे आणि मलातरी या रोषणाईमध्ये काही चुकीचं दिसलं नाही. रायगड अंधारात चालतो, पण रोषणाई नको, ही भूमिका योग्य नाही, असं अ भि कासार यांनी सुनावलंय.

पुरातत्व खात्याला सुद्धा नाईट लाईफची लहर आली आहे का ? हे काय चाललं आहे ? अहो, छत्रपतींच्या नावावर तुम्ही मतं मागत आहात. कमीतकमी त्यांचा पवित्र स्मृतीचा, गडकिल्ल्यांचा तरी आदर राखा. पुरातत्व विभागाला किल्ल्यांची डागडुजी करायला वेळ नाही ; पण हे डिस्को लाईट लावून किल्ले विद्रुप करायला आहे, अशी टीका भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे यांनी केलीय.

महाराज, आपला आदर आहे,भाजपाच्या येवढे आहारी नका जाऊ, मार्गदर्शन करा, रायगड अंधारात होता, तो खासदारांनी उजळवला,आपल्या राजाचा आज जन्म दिवस, २५/- रुपये देऊन गडावर राखीव वेळेतच जायचे ही बंधनं, आपल्या ह्या अभिमान दिनी खासदारांमुळे मोफत झाली, ह्याचा कसला राग, हे तुम्ही का नाही करू शकला..? असा सवाल केलाय अलिकडेच मनसेतून शिवसेनेत घरवापसी झालेल्या राजेश कदम यांनी.

टीम मिडिया भारत न्यूज

mediabharatnews@gmail.com / 9175292425

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!