मुंबईतील ड प्रभागात महिला विशेष बससेवा हवी

मुंबईतील ड प्रभागात महिला विशेष बससेवा हवी

मुंबईतील ड प्रभागात महिला विशेष बससेवा हवी

मुंबईतील ड प्रभागात फक्त महिलांसाठी असलेल्या विशेष बसच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी कायद्याने वागा लोकचळवळीने बेस्ट कडे केलीय. संघटनेचे दक्षिण मुंबई समन्वयक तुषार वारंग त्या संदर्भात बेस्टकडे पाठपुरावा करीत आहेत.

मुंबईतील नेपियन्सी रोड ते ग्रान्टरोड स्टेशन, कमला नेहरू पार्क ते ग्रान्टरोड स्टेशन आणि ब्रीच कॅन्डी रूग्णालय ते मुंबई सेंट्रलपर्यंत अशा तीन मार्गांवर महिलांसाठी विशेष बससेवा असावी, अशी मागणी तुषार वारंग यांनी केलीय. हा सगळा उच्चभ्रु लोकांचा परिसर असला तरी या भागात मोठ्या प्रमाणावर कामधंद्यानिमित्त मुंबईतील विविध भागांतून महिला येत असतात, असं तुषार वारंग यांचं म्हणणं आहे.

बेस्टचे वाहतूक विभागाचे उपमुख्य व्यवस्थापक एस आर जाधव यांनी तुषार वारंग यांना या संदर्भात उत्तर दिलं असून, त्यात २७ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या तेजस्वीनी बससेवेची माहिती दिलीय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरीमन पाॅईंट, कांजूरमार्ग ते मरोळ आणि बांद्रा ते बीकेसी या मार्गावर ही बससेवा सुरू आहे. मागणी केलेल्या मार्गांवरचाही प्रस्ताव मुंबई सेंट्रल आगार व्यवस्थापकाकडे पाठवला असल्याचं जाधव यांनी कळवलं आहे.


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!