फडणवीसांवर गुन्हा दाखल करा ! मुंबई काॅंग्रेसची गृहमंत्र्यांकडे मागणी !!

फडणवीसांवर गुन्हा दाखल करा ! मुंबई काॅंग्रेसची गृहमंत्र्यांकडे मागणी !!

फडणवीसांवर गुन्हा दाखल करा ! मुंबई काॅंग्रेसची गृहमंत्र्यांकडे मागणी !!

दमणमधील ब्रुक्स फार्मा कंपनी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असून, त्यात सामील असल्याचा गंभीर आरोप करत, देवेंद्र फडणवीस व इतर भाजपा नेत्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलीय.

सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणारं निवेदन जगताप यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलंय.

केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या निर्यातीवर बंदी आणलेली असतानाही, कंपनीने नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी ७५ लाख रुपयांची इंजेक्शन्स भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना विकली, असा आरोप भाई जगताप यांनी आपल्या निवेदनात केलाय.

सदरचा साठा मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर फडणवीस आणि इतर नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला, असं जगताप यांनी म्हटलं आहे.

ब्रुक्स फार्मा कंपनीचे लोक भाजपाशी संबंधित आहेत. या काळाबाजारी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या व महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि पराग अळवणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा तसंच सदर प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल जनतेसमोर आणावा, अशीही मागणी भाई जगताप यांनी केलीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!