मुंबई लोकल मर्यादित स्वरूपात आजपासून सेवेत..

मुंबई लोकल मर्यादित स्वरूपात आजपासून सेवेत..

मुंबई लोकल मर्यादित स्वरूपात आजपासून सेवेत..

मुंबई आणि महानगर क्षेत्रात सर्वात महत्वाची प्रवासी वाहतूक सेवा म्हणजे मुंबई लोकल. लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा नंतर पूर्णतः बंद करण्यात आली. परंतु लॉक डाऊन काहीसा शिथिल करण्यात आल्या नंतर कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक १५ जून २०२० पासून फक्त अत्यावश्यक_सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू होत आहेत.

सकाळी ५.३० ते रात्री ११.३० साधारण दर १५ मिनिटांनी एक ट्रेन असेल.

विरार ते चर्चगेट – ६५ अप आणि ६५ डाऊन अश्या एकूण १३० गाड्या धावतील.

डहाणू-विरार – ८ अप आणि ८ डाऊन अश्या एकूण १६ ट्रेन धावतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत/कल्याण/ठाणे ६५ अप आणि ६५ डाऊन अश्या १३० ट्रेन धावतील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल ३५ अप आणि ३५ डाऊन अश्या एकूण ७० ट्रेन धावतील.

त्याचबरोबर तिकीट बुकिंग स्टाफ साठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.  प्रवाश्यांना तिकीट आणि पास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे ओळखपत्र दाखवल्यानंतरच देण्यात यावे.

कोणाला प्रवास करता येईल?

१. बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी.
२. ठाणे महानगरपालिका कर्मचारी.
३. वसई विरार महानगरपालिका कर्मचारी.
४. पालघर नगरपालिका कर्मचारी.
५. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी.
६. मीरा भाईंदर महानगरपालिका कर्मचारी.
७. नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी.
८. पोलिस कर्मचारी.
९. बेस्ट कर्मचारी.
१०. मंत्रालय.
११. सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालय कर्मचारी.
१२. महावितरण कर्मचारी

याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे व्यवस्थापक यांनी दिली.

News by Rakesh Padmakar Meena

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!