देशातलं पहिलं खुलं हाॅस्पिटल मुंबईत कार्यान्वीत !

देशातलं पहिलं खुलं हाॅस्पिटल मुंबईत कार्यान्वीत !

देशातलं पहिलं खुलं हाॅस्पिटल मुंबईत कार्यान्वीत !

बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१०२० बेड्सची जम्बो सुविधा) उभारले. याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही उपलब्ध आहे. सदरचे हाॅस्पिटल प्रत्यक्षात कार्यान्वित झाले आहे.‌

महालक्ष्मी येथे कोरोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यात ६०० बेड्सची सुविधा आणि १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोविड-१९ चे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

नेस्को गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे. रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात उभारण्यात येतील.

३१ मे पर्यंत एनएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेस्को, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत कार्यरत स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतली. मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले असून, रुग्णवाहिकांची संख्या १०० वरून ४५० वर वाढवण्यात आली आहे.

अशी माहिती सीएमओ महाराष्ट्र या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून देण्यात आली आहे.

News by MediaBharatNews Team


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!