नगरपंचायत निकाल आणि भाजपचा अपप्रचार…

नगरपंचायत निकाल आणि भाजपचा अपप्रचार…

नगरपंचायत निकाल आणि भाजपचा अपप्रचार…

आज राज्यात नगरपंचायत आणि काही नगरपालिका निवडणुकींचे निकाल लागले. यामध्ये महाविकासआघाडीने घवघवीत यश मिळवले. अंतिम निकाल हाती आले असता भाजपचे ४१६ तर महाविकास आघाडीचे ९७६ नगरसेवक विजयी झाले. जरी असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतले घटक पक्ष देखील एकमेकांसमोर उभे होते.

पक्ष निहाय निकाल -

१) भाजप - ४१६
२) राष्ट्रवादी - ३७८
३) शिवसेना - ३०१
४) कॉंग्रेस - २९७

एकूण नगरपंचायती - १०६

१) राष्ट्रवादी - २७
२) भाजप - २२
३) कॉंग्रेस - २१
४) शिवसेना - १७

ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने महाविकासआघाडीपुढे धोबीपछाड मिळाल्यानंतर फक्त आणि फक्त शिवसेनेवर टिका आणि अपप्रचार चालू केला आहे. शिवसेना सत्तेत असुन किंवा मुख्यमंत्री असुन नगरसेवक संख्येत तिस-या तर नगरपंचायत संख्येत चौथ्या स्थानावर आहे असं भाजप नेते मिडिया वर बोलत आहेत.

मात्र वस्तुस्थिती अशी आहे की आज ज्या नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले त्यापैकी अनेक नगरपंचायती अगोदर ग्रामपंचायती होत्या आणि नगरपंचायत म्हणून ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. जर मागच्या वेळीच्या आकडेवारीचा विचार केला तर शिवसेना भाजपसोबत असताना मागच्या वेळी शिवसेनेनं २०३ जागांवर विजय मिळविला होता त्या संख्येत जवळपास १०० नगरसेवकांची वाढ होऊन ३०० च्या वर नगरसेवक आज विजयी झाले आहेत.

एवढंच नाही तर नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील यांसारख्या केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं धोबीपछाड देत मुसंडी मारली आहे. तसेच एकनाथ खडसे, के सी पाडवी, शशिकांत शिंदे आणि इतर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात देखील शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवला आहे.

आजच्या निकालात एखादा अपवाद सोडला तर एकही निकाल असा नाही की जिथे गेल्यावेळी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेली नगरपालिका यावेळी शिवसेनेच्या ताब्यातून इतर पक्षांकडे गेली आहे. उलट गेल्यावेळी १३ नगरपंचायतींवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या यावेळी १७ नगरपंचायती निवडून आल्या आहेत.

त्यामुळे भाजपने कितीही खोटा अपप्रचार केला आणि महाविकासआघाडीत फूट पाडायचा प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीच्या झंझावातापुढे भाजप आज धोबिपछाड झाली हेच अंतिम सत्य आहे. शेवटी आज सत्तेत तीन पक्ष एकत्र आहेत त्यामुळे आकडेवारी मोजताना महाविकासआघाडी विरूद्ध भाजप असेच निरीक्षण केले जाणार.

ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना ९०० वरून २८०० वर गेली तेव्हा देखील भाजपने असाच अपप्रचार केला आणि आजही तेच‌. पण असा खोटा आनंद साजरा करून काय सिद्ध होणार आहे हे त्यांनाच माहीत. बाकी येणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, संभाजीनगर या महापालिकांमध्ये शिवसेना आपली ताकद दाखवून देईलच यात काही शंका नाही.

 

 

अक्षय काळे

सोशल मीडिया समन्वयक, शिवसेना (महाराष्ट्र राज्य)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!