बाबरी मस्जिद, राममंदिर ते बौद्धस्थल ; अयोध्येत नवा वाद !

बाबरी मस्जिद, राममंदिर ते बौद्धस्थल ; अयोध्येत नवा वाद !

बाबरी मस्जिद, राममंदिर ते बौद्धस्थल ; अयोध्येत नवा वाद !

काल अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने असा दावा केला आहे की मंदिर संकुलाच्या सपाटीकरणादरम्यान जुने अवशेष सापडल्याचा दावा करण्यात येत असून, सदरचे अवशेष बौद्ध जीवनीशी संबंधित असल्याचा दावा दुसऱ्या बाजूने झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पुढे आलेल्या नवीन माहितीसह सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारीही बौद्ध धर्मीय अभ्यासकांनी चालवली आहे.

ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने 11 मेपासून समतल करण्याचे काम सुरू केले होते त्यानंतर सापडलेल्या अवशेषावर आधारीत ट्रस्टने एक निवेदन प्रगट केलं सदर निवेदनात ट्रस्टने अवशेषांबद्दलची भूमिका स्पष्ट केली.निवेदनात ट्रस्ट ने म्हटले आहे की

“समतलीकरण दरम्यान, पुरातन वास्तू, देवतांच्या खंडित मूर्ती, फुलांचे कलश, शिवलिंग इत्यादी अवशेष मोठ्या संख्येने बाहेर आले आहेत.

ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी माध्यमांना सांगितले, “आतापर्यंत ७ ब्लॅक टच स्टोन खांब, ६ रेडसँड स्टोन कॉलम, ५ फूट कोरलेले शिवलिंग आणि कमानी दगड सापडलेले आहेत पुढील सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. आहे,लेव्हिंगच्या कामात 3 जेसीबी, 1 क्रेन, 2 ट्रॅक्टर आणि 10 मजूर तैनात केले आहेत. कोरोनासंदर्भात सुरक्षा मापदंड, मास्क तसेच विशिष्ट अंतर राखणे इत्यादींचे पालन करून ही सर्व कामे काटेकोरपणे केली जात आहेत”

आपको ये शिवलिंग जैसा नज़र आ रहा है। कई लोगों को ये बौद्ध मनौती स्तूप दिख रहा है। दोनों में किसी की नीयत बुरी नहीं है।अपना-अपना नज़रिया है। विषय विवादित हो चुका है। अब ये मामला निष्पक्ष पुरातत्ववेत्ताओं के हवाले कर दिया जाए। एक निष्पक्ष दल अंतराष्ट्रीय विशेषज्ञों की निगरानी में अयोध्या में खुदाई करे। इससे किसी को डरना क्यों चाहिए? सच तो शिव है, सुंदर है।

प्रा. दिलीप मंडल स्तंभलेखक

अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन विश्रांती दरम्यान ट्रस्टने समतल करण्यास परवानगी मागितली होती, जी मंजूर झाली आहे आणि नियमांनुसार तेथील काम सुरु आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,”जे सर्व अवशेष सापडले आहेत ते ट्रस्टच्या देखरेखीखाली ठेवले आहेत आणि ते स्वच्छ केले गेले आहेत. पुरातत्व दृष्टिकोनातून त्यांची अद्याप चाचणी झालेली नाही आणि लवकरच हे करणे देखील शक्य नाही.”

याउलट बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी या अवशेषांच्या शोधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. माध्यमांशी बोलताना जिलानी म्हणाले,

“एएसआयच्या पुराव्यांनुसार तेराव्या शतकात तेथे कोणतेही मंदिर नव्हते,त्यामुळे आवशेष सापडणे हा निवळ प्रचारासाठी रचलेला अजेंडा असून त्यात कोणतेही तथ्य नाही”

जिलानींच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास पुढे आले त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी पुरातत्व विभागाने या जागेचे उत्खनन केले होते आणि उत्खननात मंदिराचे पुरावे सापडले.ज्यात हिंदू धर्माशी निगडीत नक्षी असलेले अवशेष यापूर्वीही सापडले आहेत आणि आताही ते सापडत आहेत त्यामुळे हे सत्य आहे की ह्या भूमीवर राम मंदीर होते.

हिंदू-मुस्लिमांच्या चाललेल्या ह्या शाब्दीक बाचाबाचीत आता बौद्ध धर्मीयांनीही उडी घेतली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार,

उत्खननात सापडलेले सर्व अवशेष शिवलिंग किंवा मंदिर नव्हे तर बौद्ध स्तंभाशी संबंधित आहेत आणि बौद्ध कालीन कलाकुसर त्यावर स्पष्ट पणे दिसून येत असून, त्याचा नव्याने अभ्यास व्हायला हवा.

Ayodhya is identical with the town of Saketa, where the Buddha is said to have resided for a time. Its later importance as a Buddhist centre can be gauged from the statement of the Chinese Buddhist monk Faxian in the 5th century CE that there were 100 monasteries there .

ब्रिटानिका डाॅट काॅम

ब्रिटानिकातील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

बौद्ध कालीन इतर अवशेषांची तुलना ह्या अवशेषाशी केल्यास आपल्याला स्पष्ट त्यातल साधर्म्य दिसून येईल आणि बौद्धांची ही मागणी आता पासूनची नसून मौर्य नावाच्या व्यक्तीने फेब्रुवारी-२०१९ मध्येच हा दावा केलेला होता.आणि त्यांनी तशी याचिकाही सुप्रिम कोर्टात दाखल ही केली होती कोर्टाने याचिका स्विकारली आहे. आता तोच धागा पकडून बौद्ध धर्मीय लोक ह्यात सहभागी होत आहेत आणि त्यांनी ट्विटरवर #आयोध्या_नगरी_बौद्धस्थल हा ट्रेंड अगदी जोरदार चालवला जात आहे.

गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर हा वाद थांबेल असं प्रत्येकाला वाटत असतानाच ऐन करोना महामारीच्या काळात आयोध्येत नव्या वादाची सुरुवात झाली आहे.ऐन उन्हाळ्यात उन्हापेक्षाही आयोध्येतलं वातावरण अधिक तापत चाललं आहे.

News By Ankush Hambarde Patil.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!