वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून समाजसुधारकांच्या विचारांची नवी पीढी घडेल ! संघर्ष फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मान्यवरांचं मत !

वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून समाजसुधारकांच्या विचारांची नवी पीढी घडेल ! संघर्ष फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मान्यवरांचं मत !

वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून समाजसुधारकांच्या विचारांची नवी पीढी घडेल ! संघर्ष फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मान्यवरांचं मत !

माणूस हा परिवर्तनवादी आहे. सध्याच्या परिस्थितीत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून समाजसुधारकांच्या विचारांची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी संघर्ष फाऊंडेशनने पेलली हे कौतुकास्पद आहे, असं मत लेखक व्याख्याते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेनिमित्ताने बोलताना व्यक्त केलं.

फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे पँथर दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या स्मृती प्रित्त्यर्थ त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी कोल्हापुरातील संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीज्योती करंडक विभागीय व राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम ऑनलाईनद्वारा उत्साहात संपन्न झाला.

या स्पर्धेत माध्यमिक गटात 191 व खुल्या गटात 162 एकूण 353 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .

कार्यक्रमांची सुरुवात अलका कारंजकर व सुनिल कारंजकर यांनी ‘हीच आमुची प्रार्थना ‘ हे गीत गाऊन केली. संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक चारुशीला जाधव व सिद्धार्थ जाधव यांनी दत्ता जाधव व विद्या जाधव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा व फाऊंडेशनचे उपक्रम याविषयी प्रास्ताविक केलं.

लोकप्रिय अभिनेते अंशुमन विचारे यांनी आपलं अनुभव कथन केलं. तर लेखिका साहित्यिक दीपा देशमुख यांनी वक्तृत्वाविषयी मतप्रदर्शन केलं. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी चिकाटी, सतत प्रयत्न आवश्यक आहेत असं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभाग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी काढले.

विभागीय स्पर्धा निकाल

कोकण मुंबई विभाग माध्यमिक गट
संस्कृती म्हात्रे – प्रथम, सिद्धी घाडगे – द्वितीय, तनिष्का बागवे – तृतीय, उत्तेजनार्थ – शमिका चिपकर, हर्षाली पाटील
कोकण मुंबई विभाग खुला गट
पराग बद्रिके -प्रथम, सिद्धी नार्वेकर – द्वितीय., अमोल गोळे – तृतीय, उत्तेजनार्थ – यश पाटील, सविता वाळके
मराठवाडा विभाग माध्यमिक गट
पार्थ भेंडेकर -प्रथम, अनुसया कुलथे – द्वितीय, तृप्ती घाटे – तृतीय, उत्तेजनार्थ – शंभूराजे जळके, विशाल कांबळे,
मराठवाडा विभाग खुला गट
रेणुका धुमाळ प्रथम, संजीवनी सोमासे द्वितीय, मंदार लटपटे तृतीय, उत्तेजनार्थ -आरती पुरी, अश्विनी घुगे
विदर्भ विभाग माध्यमिक गट
ईश्वरी सुडके प्रथम, मयूर छबिले द्वितीय, चक्रधर पंजरकर व अर्णव कदम तृतीय विभागून, उत्तेजनार्थ – धनश्री चिंचोलकर, मृणाल काळे
विदर्भ विभाग खुला गट
वैष्णवी हागूने प्रथम, विषय गवळी द्वितीय, सोनल भिगवडे तृतीय, उत्तेजनार्थ – प्रतीक राऊत, सुप्रिया सिद्धापूरे, वैष्णवी ठाकरे
उत्तर महाराष्ट्र विभाग माध्यमिक गट
सिद्ध बाफना प्रथम, स्वानंदी ठाणगे द्वितीय, वृषांक जाधव तृतीय, उत्तेजनार्थ – सलोनी ठाकरे, नेहाला जोशी,
उत्तर महाराष्ट्र विभाग खुला गट
वृषभ चौधरी प्रथम, प्रज्वल नरवडे द्वितीय, स्वराली गोडबोले तृतीय, उत्तेजनार्थ – वृषाली घोडके, अपेक्षा लोखंडे, ऋतुजा गंगावणे
पश्चिम महाराष्ट्र विभाग माध्यमिक गट
जयश्री जाधवर प्रथम, प्रतीक खेडकर द्वितीय, स्मित प्रधान तृतीय, उत्तेजनार्थ – सत्यजित माळी, राजवर्धन काळे
पश्चिम महाराष्ट्र विभाग खुला गट
अक्षय इळके प्रथम, सिद्धेश मिसाळ द्वितीय, प्रणव जगताप तृतीय, उत्तेजनार्थ -मारुती साबळे, तेजस्विनी पाटील
राज्यस्तरीय माध्यमिक गट
विशाखा आरेकर – प्रथम, प्रसाद परळे द्वितीय, वृषांक जाधव, हर्षदा पवार व सिद्धी घाडगे – विभागून तृतीय, उत्तेजनार्थ – मयुरी कांबळे, वेदांत गावंडे, संस्कृती म्हात्रे, शमिका चिपकर, मयूर चबिले
राज्यस्तरीय खुला गट
सिद्धेश मिसाळ प्रथम, अक्षय ईळके द्वितीय, आशुतोष निकम तृतीय, उत्तेजनार्थ -प्रसाद जगताप, सुजित काळंगे, रोहन कवडे, शिवम माळकर, विवेक वारभुवन, रेणुका धुमाळ

वैशाली जाधव ,नागसेन जाधव, सचिन अकोलकर, अतुल रुकडीकर, सरोज रुकडीकर, संजय बोत्रे, अलका कारंजकर, सुनिल कारंजकर , प्रमोद मोहिते, सुहास चव्हाण, अक्षय जहागीरदार, रमजान मुल्ला, काजल काळे, ऋतुजा जगदाळे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!