न्यूयॉर्क हॉस्पिटल्समधून आलेला कोव्हीड-१९ वरचा अद्ययावत रिपोर्ट ; चिंताजनक, पण निराश होण्याचं कारण नाही !

न्यूयॉर्क हॉस्पिटल्समधून आलेला कोव्हीड-१९ वरचा अद्ययावत रिपोर्ट ; चिंताजनक, पण निराश होण्याचं कारण नाही !

न्यूयॉर्क हॉस्पिटल्समधून आलेला कोव्हीड-१९ वरचा अद्ययावत रिपोर्ट ; चिंताजनक, पण निराश होण्याचं कारण नाही !

(Note: या सर्व गोष्टी रोग बरा होऊन माणूस घरी गेल्यानंतरच्या आहेत. अत्यंत चांगली बातमी म्हणजे न्यूयॉर्कच्या अनेक हॉस्पिटल्समध्ये आता कोव्हिडचा एकही रोगी शिल्लक नाही. )

१. रोग झालेल्यांमध्येही सुमारे २० टक्के पेशंट्स मध्ये व्हायरस-विरोधी अँटीबॉडी सापडत नाही आहे. ज्यांच्यात अँटीबॉडी सापडते त्यांच्यातील अनेकांत ती दोन महिन्यात ओसरू लागत आहे. मध्यम तीव्रतेच्या रुग्णांपैकी चाळीस टक्के लोकांमध्येच ती टिकून राहिलेली दिसते. तीव्र रोग्यांमधली बरीचशी निघून जाते. हे सर्व “हर्ड इम्यूनिटी ” निर्माण होण्याच्या, तसेच व्हॅक्सीन्स यशस्वी होण्याच्या दृष्टीने अनिष्ट आहे.

२. कोव्हीड-१९, तसेच इंफ्लेमेशन निर्मण करणाऱ्या इतरही व्हायरल रोगांमध्ये, रोगाची दुसरी फेरी , पहिलीपेक्षा अधिकच तीव्र होत जाताना दिसत आहे. आधीची अँटीबॉडी , आपल्या “Fc” या भागाने , मानवी पेशीवरचा एक वेगळाच दरवाजा (रिसेप्टर) उघडून व्हायरसला पेशीत घुसण्यात मदत करते असे एक कारण यामागे असू शकेल. चीनमध्ये आधी मर्स (२०१२), तसेच H1N1 या व्हायरसचे पूर्वी इन्फेक्शन झालेल्यांच्यात , अधिक तीव्रतेने कोव्हीड-१९ दिसला होताच. त्यामुळे “एकदा काय व्हायचे होऊ जाऊ दे ” अशा प्रकारे, स्वतःला सौम्य इन्फेक्शन वगैरे करून घ्यायचा प्रयत्न करणे (जे अमेरिकेत तरुण मंडळी करत आहेत!) हे मूर्खपणाचे ठरू शकते.

३. कोणत्या प्रकारची इम्यूनिटी संरक्षक ठरणार आहे: पेशी-जन्य, का अँटीबॉडी-जन्य हे अजून स्पष्ट झालेले नाही. अशा वेळी मोठया प्रमाणात जे “एस” प्रथिनाविरुद्ध अँटीबॉडी निर्माण करणे या दिशेने जे व्हॅक्सिन संशोधन चालू आहे, ते (काहीसे) चुकीच्या दिशेने चालू असण्याची शक्यता आहे. मृत-व्हायरस-व्हॅक्सिनची कार्यपद्धती (उदा. भारत बायोटेक) ही सुद्धा अधिक करून अँटीबॉडी या दिशेचीच असते हे काल मांडले होतेच. असे नसेल अशी आशा करूया.

४. रोगातून बाहेर पडल्यावर दोन, तीन महिने, अशक्तपणा, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे , सततचा थकवा, वेगाने चालत/धावता न येणे असे परिणाम दिसत आहेत. एक महिन्या नंतरही फुफ्फुसांची हानी टिकून असल्याचे, तसेच श्वसनाचे स्नायू दुबळे राहिल्याचे दिसत आहे. हे किती दिवस टिकून राहील हे अजून समजलेले नाही.

५. रुग्ण स्त्रियांमध्ये, विशेषतः तरुण स्त्रियांमध्ये , चिंताग्रस्तता, निराशा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हे काऊन्सेलिंग , औषधे याने जाऊ शकते, पण ते “असते” याचे भान येण्याची गरज आहे. नाहीतर , हे अंग उपेक्षित राहिल्यास त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात.

६. एका श्वसन-रोग तज्ञाच्या हातात एन-असेटिलसिस्टीन या औषधाला चांगले रिझल्ट्स मिळत आहेत.

( बराचसा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मांडल्याबद्दल क्षमस्व. पण सत्य समोर येणे महत्वाचे आहे. )

पण अशा “लवकर संपुष्टात येणाऱ्या” औषध किंवा व्हॅक्सिन ऍक्शन बाबत, शरीरात हळूहळू विरघळत राहून ती प्रथिने सोडणाऱ्या पॉलिमेरिक मायक्रोस्फिअर (सूक्ष्म गोलाकार कण ) मध्ये अशी प्रथिने (उदा. अँटीजेन) घालून शरीरात टोचणे असा एक उपाय असू शकतो. पॉली-कॅप्रोलॅकटोन हा पॉलीमर त्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे शास्त्र बरेच विकसित झालेले आहे. याप्रकारे अनेक महिने ते अँटीजेन प्रथिन सोडत राहून, दीर्घ मुदतीची इम्युनिटी देणारे व्हॅक्सिन तयार करता येईल. (सोबतच्या चित्रात एका प्रायोगिक प्रथिनाला (कोव्हीड नव्हे) सहा महिन्याहूनही अधिक मुदतीचा अँटीबॉडी रिस्पॉन्स मिळालेला दिसत आहे!)

तरुण व्यक्तीची रोग-प्रतिकारक शक्ती सुद्धा अनेक मार्गानी कमी होऊ शकते. यात दारू, ड्रग्ज, कॅन्सर , एड्स, लिव्हर किंवा किडनी फेल्युअर , अनियंत्रित उच्च रक्तदाब किंवा मधुमेह , कुपोषण, ताणतणाव , केवळ जनुकीय अशी कित्येक कारणे असू शकतात. त्यामुळे ‘आपल्याला कोव्हीड-१९ होत नाही’ अशा भ्रमात तरुणांनी राहू नये! सर्व खबरदारी घेऊन स्वतःचे व इतरांचे प्राण वाचवावे!

मी मांडलेली निरीक्षणे ही प्रत्यक्ष रोग झालेल्या लोकांवरची आहेत, व्हॅक्सिन टोचलेल्यांवरची नाहीत. व्हॅक्सिनचे किमान आठ निरनिराळे प्रकार आहेत. सध्या एम आर एन ए , आणि मृत-व्हायरस या दोन प्रकारांबाबत बातम्या येत आहेत. बाकीच्या सहा प्रकारातून काय येते तेही बघूया. या आठ प्रकारांचा एक सर्वंकष आढावा मांडणारा लेख लिहायला घेतला आहे. तसेच कोणताही अँटीजेन “संरक्षक ” इम्युनिटी देतो असे दिसले , की त्या व्हॅक्सिन च्या परिणामांचा कालखंड वाढविणे याचेही एक वेगळे, आणि यशस्वी विज्ञान आहेच. इतक्यात निराश होण्याचे कारण नाही.

मिलिंद पदकी

मुंबई विद्यापीठातून पीएचडी. अमेरिकेत स्थायिक. समाजमाध्यमांवर अभ्यासपूर्ण लिखाण करीत असतात.

MediaBharatNews

Related Posts
comments
  • Simply wish to say your article is as amazing. The clarity on your publish is just
    great and that i can think you are a professional on this subject.
    Well with your permission allow me to snatch your RSS feed to stay
    up to date with imminent post. Thank you a million and please carry
    on the gratifying work.

    Stop by my page … Royal CBD

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!