रिपब्लिक भारतने डोकं बिघडवलं ! आरोपींची कबुली !!

रिपब्लिक भारतने डोकं बिघडवलं ! आरोपींची कबुली !!

रिपब्लिक भारतने डोकं बिघडवलं ! आरोपींची कबुली !!

रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीवर अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर व त्या वाहिनीवरील अॅन्करने सुशांतच्या मृत्यूसंदर्भात दिलेली माहिती ऐकल्यानंतर आपल्या मनात गैरसमज निर्माण झाले, असं विभोर आनंद याने न्यायालयासमोर मान्य केले आहे.

विभोर आनंद या दिल्लीच्या वकिलाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मुंबई पोलिसांनी विभोर आनंदविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती. आता न्यायालयाने विभोर आनंदला जामीन मंजूर केला आहे ; परंतु जामिनाच्या अटीनुसार सात दिवसांच्या आत विभोरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची सार्वजनिकरित्या माफी मागावी लागणार आहे !

शिवाय अशा प्रकारचे कृत्य आपण पुन्हा करणार नाही, अशीही ग्वाही विभोर आनंदच्या वकिलांनी न्यायालयासमोर दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंग यांचा मृत्यू आत्महत्या नसून ती हत्या होती ; दिशा सालियन हिचीसुद्धा हत्या झाली होती, असं रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनी वरून वारंवार मांडलं जात होतं. ते ऐकूनच आपण भावनेच्या भरात टिपणी केली होती; त्यात वैयक्तिकरीत्या कोणालाही मुद्दाम दुखावण्याचा हेतू नव्हता, असं विभोर आनंद याने न्यायालयाला सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!