…तर राणेंचा बाजार उठवू !

…तर राणेंचा बाजार उठवू !

…तर राणेंचा बाजार उठवू !

” राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात…” ह्या ग्रामीण विकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यावर उलट इशारा देताना भाजपा नेता निलेश राणे यांनी त्यांचा हिजडा असा केलेला उल्लेख मागे न घेतल्यास बाजार उठवू, असा इशारा जेंडर एक्टिविस्ट सारंग पुणेकर यांनी दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांसंदर्भात केंद्राला दिलेल्या पत्रावरून निलेश राणेंनी ट्वीट केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी “साहेबांनी कुक्कुटपालन संदर्भातही पत्र दिलंय” असा टोमणा मारला होता.

त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर या वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेऊन ” राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात…” असं ट्वीट केलं होतं.

त्यावर, ” कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा…असा आक्षेपार्ह उल्लेख निलेश राणेंनी केलाय. सारंग पुणेकरांनी त्याबाबत संताप व्यक्त केलाय.

” जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल तर मी सांगते, पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला, हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य इथे बाजार उठवला जाईल”, असा इशाराच सारंग यांनी राणेंना दिलाय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!