अफगणिस्ताकडून भारताला धोका नाही ; शायर मुनव्वर राणा यांचा अंदाज !

अफगणिस्ताकडून भारताला धोका नाही ; शायर मुनव्वर राणा यांचा अंदाज !

अफगणिस्ताकडून भारताला धोका नाही ; शायर मुनव्वर राणा यांचा अंदाज !

हजारो वर्षापासूनचा हा इतिहास आहे की अफगाणींनी भारताचं कधीही नुकसान केलेलं नाही; त्यांनी जे कमावलंय ते भारतातून कमावलं आहे. अगदी त्यांच्या लेकीबाळींची अब्रू झाकणारे कपडेही भारतातून नेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानाकडून धोका आहे, पण अफगाणिस्तानकडून भारताला कोणताही धोका नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी केलंय.

आज तक या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

अफगाणिस्तानात आता तालिबानी सत्ता आली असून ती दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते, मग आता त्यांच्यापासून भारत सुरक्षित आहे का, असं विचारलं असता मुनव्वर राणा म्हणाले की अफगाणिस्तानातल्या अनेक टोळ्यांपैकी तालिबान ही एक टोळी आहे, ते म्हणजे अफगाणिस्तान नाही !

त्यावर, ते आपल्याच देशातील लोकांना त्रास देतायंत तर शेजारी राष्ट्राची कसे चांगले राहतील, या पत्रकारांच्या प्रश्नावर मुनव्वर राणा यांनी टोला हाणला की ही बाब भारतालाही लागू होते ! बात निकलेगी तो दूर तलक जायेगी…असंही सूचक विधान त्यांनी केलं.

तालिबानला भारताने घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांच्यापेक्षा अधिक क्रूरता आपल्याकडे आहे, असंही वक्तव्य मुनव्वर राणा यांनी केलं.

भारत अहिंसावादी देश आहे, या पत्रकाराच्या विधानावर राणा म्हणाले की आहे नाही होता. हे रामराज्यही नाही, काम राज्य आहे ! रामाकडे काही काम असेल तर राम आपला ! अशी टीकाही मुनव्वर राणा यांनी केलीय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!