मुंबई आजपासून विनामास्कसाठीचा दंड रद्द !

मुंबई आजपासून विनामास्कसाठीचा दंड रद्द !

मुंबई आजपासून विनामास्कसाठीचा दंड रद्द !

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एमजीसी/एफ/2888 दि. 19.02.2021 अन्वये, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर रु.200/- चे दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार मुंबई पोलीस यांना प्रदान केले होते.. ते अधिकार १ एप्रिलपासून पासून संपुष्टात येत असल्याचं पत्र मुंबई महापालिकेने जारी केलं आहे.

ही बातमी एप्रिल फूल नसून मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी संबंधित पत्र ट्वीट केलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा-या नागरिकांवर मुंबई पोलिसांकडून करण्यात येणारी दंडात्मक कारवाई विनाविलंब थांबवावी, याशिवाय, मनपा कडून पोलिसांना देण्यात आलेली दंडाची पावती पुस्तके परत करावीत व दंडात्मक कारवाई केलेल्या रक्कमेचा भरणा मनपाकडे करावा, असं पत्रात म्हटलेलं आहे.

सदरबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या व त्या संदर्भाने आपण महापालिका आयुक्तांना विनंती केली होती, ती त्यांनी मान्य केल्यामुळे आभार मानतो, असं ट्वीट संजय पांडे यांनी केलं आहे.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!