वंदे भारताचा दुबईतील मराठीजनांना मात्र ठेंगा ! मनसेने घेतला पुढाकार !

वंदे भारताचा दुबईतील मराठीजनांना मात्र ठेंगा ! मनसेने घेतला पुढाकार !

वंदे भारताचा दुबईतील मराठीजनांना मात्र ठेंगा ! मनसेने घेतला पुढाकार !

संयुक्त अरब अमिरातीत महाराष्ट्रातील जवळपास हजारेक कुटुंबे अडकलेली असून अनेकांची नोकरी गेल्यामुळे व उत्पन्नाचे कोणतेही साधन हातात नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. भारतात परतण्यासाठी या मंडळींनी भारतीय वकिलातीशी संपर्क साधला असता “जरा धीर धरा” इतकंच साचेबद्ध उत्तर त्यांना मिळत आहे.

मराठी कुटुंबांना भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव आणावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

वंदे भारत योजनेअंतर्गत परदेशातील अनेक भारतीयांना देशात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. परंतु संयुक्त अरब अमिराती अडकलेल्या मराठी कुटुंबांसाठी वंदे भारत योजनेतून कोणताही प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही असं नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

जी मराठी कुटुंबे दुबईत अडकली आहेत, त्यात वयोवृद्ध तसंच काही गर्भवती महिलांचाही समावेश आहे. परदेशातील नागरिकांना भारतात आणायचे असल्यास संबंधित राज्याच्या गृह खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच विदेश मंत्रालय व हवाई उड्डाण मंत्रालयाकडून विमानसेवेची व्यवस्था केली जाते; त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने सदर कामी पुढाकार घ्यावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!