भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महिलांचं स्थान नगण्यच ! जिल्हाध्यक्षांत एकही महिला नाही !!

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महिलांचं स्थान नगण्यच ! जिल्हाध्यक्षांत एकही महिला नाही !!

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महिलांचं स्थान नगण्यच ! जिल्हाध्यक्षांत एकही महिला नाही !!

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केलीय. ६७ पदाधिकाऱ्यांत केवळ ११ महिला आहेत. भारतीय जनता पार्टीत महिलांचं प्रतिनिधित्व अवघं १६ टक्के आहे. महाराष्ट्रभरच्या घोषित १३९ जिल्हाध्यक्षांमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही.

राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या चित्रा वाघ आणि डॉ. भारती पवार यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागलीय. प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष बनवून भाजपाने पंकजा मुंडेंना शांत करण्याचा प्रयत्न केलाय. त्याशिवाय अॅड. माधवी नाईक उपाध्यक्ष पदाच्या यादीत आहेत. १२ उपाध्यक्षांच्या यादीत चार जागा महिलांकडे आहेत.

आमदार देवयानी फरांदे यांच्या नेमणुकीने भाजपाने पहिल्यांदाच महामंत्रीपदी एका महिलेची निवड केलीय.

कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांत मंत्रीपदी रक्षा खडसे, अर्चना डेहनकर, स्नेहलता कोल्हे यांचा समावेश आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी उमा खापरे यांना नेमण्यात आलंय.

बुद्धिजीवी प्रकोष्ठ च्या संयोजकपदी जयश्री चित्रे आणि शिक्षक प्रकोष्ठपदी कल्पना पांडे यांची नियुक्ती झालीय.

पंकजा मुंडे, रुपाताई निलंगेकर पाटील, शोभा फडणवीस, विजया रहाटकर, माया इवनाते यांना प्रदेश कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून मान देण्यात आलाय.‌

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!