आकडेवाडीपेक्षा रुग्णसुविधा आणि उपचारांचं नियोजन महत्त्वाचं !

आकडेवाडीपेक्षा रुग्णसुविधा आणि उपचारांचं नियोजन महत्त्वाचं !

आकडेवाडीपेक्षा रुग्णसुविधा आणि उपचारांचं नियोजन महत्त्वाचं !

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे सांगितले.

महाराष्ट्रातली रुग्णसंख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत.

फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८०% बेड्स राखीव ठेवणे, १००% कॅशलेस उपचार व इतर गोष्टी प्रभावी ठरत आहेत. महाराष्ट्र यात देशात उदाहरण निर्माण करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आता आकडेवारीपेक्षा रुग्णांना काय सुविधा देत आहात, त्यांना बरे करणे, उपचारांचे उत्तम नियोजन करण्याला महत्व आहे.

संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.

मुंबईत चेस दि व्हायरस परिणामकारक दिसू लागली आहे. तशीच ती राज्यात इतरत्रही राबविली गेली पाहिजे. खूप गांभीर्याने मोहीम घ्यावी लागेल. टा

फोर्सने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वेही राज्यातील सर्व रुग्णालयांपर्यंत पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

छोटी छोटी रुग्णालये जी विविध आजारांवर शस्त्रक्रिया करतात त्यांना कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करू नये अन्यथा इतर रोगांसाठी उपचाराला रुग्णालय शिल्लकच राहणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!