आरोग्य मंत्र्यांचं डॉक्टरांना खुलं पत्र !

आरोग्य मंत्र्यांचं डॉक्टरांना खुलं पत्र !

आरोग्य मंत्र्यांचं डॉक्टरांना खुलं पत्र !

कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रिय डॉक्टर्स..

आज तुमचा दिवस त्या निमित्त खूप सा-या शुभेच्छा! तसा तुमचा असा कुठला एक दिवस असू नये कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का?तो दररोज आपल्याला हवा असतो.कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात.आज सगळीकडे धार्मिक स्थळ बंद असताना त्यातील देव कुठे असतील तर ते तुमच्या रुपाने सगळ्यांना दिसतोय अशी सार्वत्रिक भावना आहे.हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नांमुळे म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही आम्ही सर्वच कोरोनाला हवण्याच्या ध्येयाने लढतोय.डॉक्टर तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत.पोलिस आहेत.अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत आपल्या सर्वांच्या या प्रयत्नांमुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहे.

डॉक्टर आपली जबाबदारी मोठी आहे.कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना ठणठणीत बरे करण्याचे काम तुम्ही करीत आहात.समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पहातेय पण डॉक्टर आपण कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारांतून बरे नाही करत तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभं करीत आहात.आपल्या हातून घडणाऱ्या मानवसेवेचे मोल कशानेही मोजता येणार नाही.

तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अधकपणे अविरत दोन हात करताय.आज राज्यात दिड लाख कोरोना बाधितापैकी जवळपास ९० हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आपण व आपल्या सहका-यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे.या संकटकाळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे.तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडत आहात.आम्ही तुमची काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देत आहात.डॉक्टर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.

राजेश टोपे

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!