राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याचं चित्र लावलंय ? काय आहे या चर्चेमागचं सत्य?

राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याचं चित्र लावलंय ? काय आहे या चर्चेमागचं सत्य?

राष्ट्रपती भवनात नेताजींऐवजी अभिनेत्याचं चित्र लावलंय ? काय आहे या चर्चेमागचं सत्य?

२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये नेताजींच्या एका चित्राचं अनावरण करण्यात आलं. या चित्राचे फोटो राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवरुनही पोस्ट करण्यात आलेत. मात्र राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील व्यक्ती खरे नेताजी नसून अभिनेता प्रसूनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला. पण काय आहे नेमकं सत्य ?

प्रसूनजित यांनी यांनी गुमनामी नावाच्या एका बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील हा फोटो असल्याचा दावा अनेक बडे पत्रकार आणि नेते मंडळींनी करुन राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील प्रशासनावर टिकेची झोड उठवली. त्यानंतर समाजमाध्यमांतूनही अनेकांनी हे ट्विटस आपल्या आपल्या वॉलवर फिरवून राष्ट्रपतींचा निषेधही केला.

हा फोटो प्रसूनजित चॅटर्जी यांचाच असल्याचा प्रथम दावा डॉ. अदिल हुसैन नामक ट्विटर व्यक्तीने केल्यानंतर तोच धागा पकडत प्रामुख्याने पश्चिम बंगाल काँग्रेसचे अधिकृत ट्विटर खाते, तृणमुल काँग्रेसच्या खासदार महूआ मोइत्रा, तामीळनाडू काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष मोहन कुमारमंगलम्, छतीसगढचे आरोग्यमंत्री टी.एस.देव यांनीही याद्वारे भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.

या सर्वांमध्ये काही पत्रकार मंडळीनीही शहानिशा न करता हा फोटो अभिनेत्याचाच असल्याचा दावा करणारे ट्विट केले यात बरखा दत्त, शिव अरुर, स्वाती चतुर्वेदी,राजदीप सरदेसाई आदींचा समावेश आहे. या बड्या लोकांनीही दावा केल्यानंतर तो फोटो खरेच प्रसूनजित चॅटर्जी यांचाच असल्याचा मोठा भ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता.

हे प्रकरण मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे लक्षात येताच शासकीय पातळीवरुन हा फोटो नेताजी सुभाष चंद्र बोस यांचाच असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नातू आणि नेते चंद्र कुमार बोस यांनी २०१९ सालीच हा फोटो ट्विट केला होता. फरक इतकाच होता की राष्ट्रपती भवनातला फोटो हा कलर फोटो आहे आणि चंद्र कुमार बोस यांनी १ वर्षापूर्वी ट्विट केलेला फोटो हा ब्लॕक अॕण्ड व्हाईट आहे; त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की राष्ट्रपती भवनातील फोटो हा अभिनेते प्रसूनजित चॅटर्जी यांचा नसून नेताजी सुभाष चंद्र बोस यांचाच आहे.

इंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो माध्यमांवर आर्ट लाईव्ह नामक खात्यावरुन दिलेल्या माहितीनुसार, मूळ काळ्यापांढऱ्या छायाचित्रावरून पद्मश्री परेश मैती या प्रसिद्ध चित्रकारांनी नवं चित्र रंगवलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. परेश मैती यांचा फोटो राष्ट्रपती भवनात वापरला असल्याचं सरकारचं म्हणणं आहे आणि ते अनेकांगी सत्याच्या जवळपास जाणारं आहे.

सरकारकडून स्पष्टीकरण आल्यानंतर अभिनेत्याचा फोटो वापरल्याचा दावा करणाऱ्या अनेक जणांना आपले ट्विट्स डिलीट करावे लागले आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!