प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम स्थगित !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम स्थगित !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम स्थगित !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काल रात्रीपासून आजारी आहेत. पोटात दुखू लागल्यामुळे पवार अस्वस्थ होते. काल संध्याकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. तिथे त्यांना गाॅल ब्लेडर चा त्रास असल्याचं निष्पन्न झालं आहे.

31 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. इंडॉस्कॉपी केल्यानंतर आवश्यक शस्त्रक्रियाही केली जाईल. सध्या शरद पवार ब्लड थिनिंग उपचार प्रक्रियेवर आहेत. ती सध्या थांबवण्यात आली आहे.

एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!