दुचाकीस्वारांवर का डूख धरून आहे पावसचा बिबट्या ?

दुचाकीस्वारांवर का डूख धरून आहे पावसचा बिबट्या ?

दुचाकीस्वारांवर का डूख धरून आहे पावसचा बिबट्या ?

रत्नागिरीतील पावस भागात एका बिबट्याच्या वावरामुळे भीतीचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसात बिबट्याने लोकांवर वारंवार हल्ले केले असून, विशेष म्हणजे सगळे हल्ले दुचाकीस्वारांवरच झालेले आहेत. बिबट्याचा दुचाकीस्वारांवरचा राग हा आता पावस परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ताज्या घटनेत रत्नागिरी तालुक्यातील कुंभारघाटी ते गणेशगुळे फाट्या दरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यात गणेशगुळेचे सरपंच संदीप शिंदे जखमी झाले आहेत. पण त्यानंतर बिबट्याने थोड्या थोड्यावेळाने काहीजणांवर हल्ला केला. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

ताजी घटना पावसच्या मावळत्या सड्यावरची असून, बिबट्याच्या या हल्ल्यात आठ जण जखमी झाले आहेत. शासकीय रूग्णालयात सर्वजण उपचार घेत आहेत. यापूर्वी जुलै महिन्यातही दुचाकीस्वारांना बिबट्याने लक्ष्य केलं आहे.

गेल्या दोन महीन्यांत बिबट्यांनी याच रस्त्यावर तब्बल पंधरा लोकांवर हल्ला केलाय. पण अजूनही या बिबट्यांना जेरबंद करण्यात फाँरेस्ट खातं अपयशी ठरलंय.

केतन पवार, सामाजिक कार्यकर्ता

मावळंगे जाधववाडीतील योगेश जाधव (३० वर्षे) आणि त्याचा पुतण्या विक्रांत जाधव हे दररोज सकाळी गणेशगुळ्यात जिममध्ये जातात. सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे घरून निघाले. पूर्णगड रोडकडे आल्यानंतर या परिसरात वावर असलेल्या बिबट्याच्या मादीने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. घाबरून जाऊन दोघे गाडीजवळच उभे राहिले. योगेश आणि विक्रांत यांनी एकीकडे बिबट्यासोबत झटापट करत असताना आरडाओरड केली. चिडलेल्या वाघाने योगेशच्या डाव्या पायावर तर विक्रांतच्या पाठीवर आणि समोरून पंजे मारले. दोघांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या मादी थोडी मागे सरकली व एका झाडाजवळ उभी राहिली. याचा फायदा उठवत प्रसंगावधान राखून योगेशने दुचाकी सुरू करून उलट्या म्हणजे पावसच्या दिशेने पिटाळली. या प्रकाराने बावचाळलेली मादी पुन्हा हल्ला चढवणार, तोपर्यंत आजुबाजुच्या वाडीतील लोक आले व त्यांनी दोघांना पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात यायला मदत केली. मात्र, दोघांनाही गंभीर इजा झाल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग जिवितहानीची वाट पाहतंय का?

रविकिरण तोडणकर,

शिवसेना विभागप्रमुख

त्यानंतर आठवड्याभरात दुसरा हल्ला १५ जुलै रोजी संतोष कुरतडकर आणि मंगेश खेर्डे यांच्यावर झाला. पावस – मेर्वी रोडवर गणेशगुळे येथे बिबट्याने दोघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला होता. आता पुन्हा मावळत्या सड्यावरच्या ताज्या हल्ल्याने पावसकर भयभीत झाले आहेत.

सरपंच शिंदे आणि विश्वास सुर्वे हे घरी निघाले होते. गणेशगुळेला जात असतानाच बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी निखिल साळवी व बळीराम जोशीलकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला. पुन्हा थोड्या वेळाने मेरवी गावचे रहिवासी निलेश म्हाद्ये यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. याच मार्गावर पुन्हा काही मिनिटांनी कशेळी येथील ग्रामस्थ नीलेश नाटेकर, मंजुनाथ आदी यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. हल्ला करणारे दोन बिबटे असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

या सर्व जखमींवर पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पाठोपाठ हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही बिबट्याने हल्ला करून अनेक दुचाकीस्वारांना जखमी केल्याच्या घटना गेल्या तीन महिन्यात घडल्या आहेत. आतातरी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

गेले महिनाभर गणेशगुळे फाटा आणि कुडते येथे वनखात्याने दोन पिंजरे लावून ठेवले आहेत. तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे बिबट्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, पण बिबट्या काही तावडीत सापडत नाहीये.

 

लेखाखालील प्रतिक्रिया रकान्यात आपलं मत जरूर नोंदवा.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!