धर्मांधतेपायी खंडणीखोरांना धर्मरक्षक समजून बसलेत लोक !

धर्मांधतेपायी खंडणीखोरांना धर्मरक्षक समजून बसलेत लोक !

धर्मांधतेपायी खंडणीखोरांना धर्मरक्षक समजून बसलेत लोक !

कर्नाटकात गोवंश हत्या विरोधी कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. त्यावरून त्या राज्यात राजकीय धुमश्‍चक्री सुरू आहे. अलिकडेच मोहम्मद यासीन या गोतस्कराला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. भटक्या गाईंना चोरून त्यांना कत्तलखान्यात विकण्याचा मोहम्मद यासीनचा धंदा आहे.

परंतु यासीनची चौकशी करताना कर्नाटक पोलिसांना आणखी एक नाव समजलं. ते होतं अनिल प्रभू ! हा प्रभू बजरंग दलाचा कर्काला जिल्ह्याचा माजी अध्यक्ष आहे ! भटक्या गाईंना चोरून कत्तलखान्यात विकण्यात यासीनसोबत प्रभूसुद्धा भागीदारीत आहे. गोतस्करीचा आणि गोहत्येचा हा धंदा मोहम्मद यासीन आणि बजरंग दलाचा पदाधिकारी मिळून करतात. शिवाय, पोलिस कारवाईपासून वाचवण्यासाठी कत्तलखान्यातून अनिल प्रभूला खंडणी मिळते, अशीसुद्धा माहिती यासीनने पोलिसांना दिली आहे.

६ नोव्हेंबरला कर्कालातील बेंडलेगुड्डे नाक्यावर पोलिसांनी मोहंमद यासीनला हेल्मेट नव्हतं म्हणून अडवलं होतं ; पण यासीनने गाडी टाकून पळ काढला होता. त्यावेळी गाडीच्या तपासणीत एका प्लास्टिक बॅगेत गायीचं मुंडकं आणि मांस आढळून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हुडको काॅलनीतून यासीनला अटक केली होती.

मध्यप्रदेशात बजरंग दलाचे कार्यकर्ते पाकिस्तानच्या आयएसआयसाठी भारतीय सैन्याची हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडले गेलेत. एका तेल व्यापार्‍याच्या पाच वर्षाच्या जुळ्या मुलांची खंडणीसाठी हत्या करण्याच्या गुन्ह्यातही बजरंग दलाच्या पदाधिकारी आरोपी होते.

अशी अनेक प्रकरणे असतील. पण धर्मविद्वेषाचं राजकारण गुंडगिरीच्या जोरावर रेटण्यासाठी भाजपाला बजरंग दलाचा वापर करायचा असल्यामुळे हिंदुत्ववादी राजकारणाच्या आड इतरही गुन्हेगारी व खंडणीखोरी करण्याचा परवानाच जणू आपल्याला मिळाला असल्याचं काही गुंडांना वाटलं तर त्यात नवल कसलं ?

अर्थात, अनिल प्रभुचा बजरंग दलाशी संबंध असल्याचा त्या संघटनेने इन्कार केला आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!