ब्रेक द चेन, एन्जॉय रेन ! पावसात महाराष्ट्र मोकळा श्वास घेणार ! मुख्यमंत्र्यांची शिवसेनेतून चाचपणी !!

ब्रेक द चेन, एन्जॉय रेन ! पावसात महाराष्ट्र मोकळा श्वास घेणार ! मुख्यमंत्र्यांची शिवसेनेतून चाचपणी !!

ब्रेक द चेन, एन्जॉय रेन ! पावसात महाराष्ट्र मोकळा श्वास घेणार ! मुख्यमंत्र्यांची शिवसेनेतून चाचपणी !!

महाराष्ट्रात कठोर निर्बंध या गोंडस नावाखाली म्हटलं तर लाॅकडाऊनच सुरू आहे. दोन दिवस, चार दिवस वाढवता वाढवता सरकारने ते आता १ जूनपर्यंत खेचलंय. पावसाळ्यात लोकांना फार कोंडून ठेवण्याची सरकारची इच्छा नाहीये. लसीकरणाचा वेग तुटवड्यामुळे मंदावला असला तरी कोरोना फैलावाला आळा घालण्यात महाराष्ट्र राज्य यशस्वी झालंय.

अन्य राज्यातून येणारं दळणवळण जर नियंत्रित ठेवता आलं तर जून महिन्यात महाराष्ट्र स्थिरावलेला असेल आणि मनमोकळेपणाने पावसाचा आनंद घेऊ शकेल ! याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधून जमीनी वस्तुस्थितीचा अंदाज घेतलाय.

कोविड संसर्गाच्या मागच्या लाटेत मुंबईतील धारावी आराखडा जगभर गाजला होता. जागतिक आरोग्य संघटनेने त्याची विशेष दखल घेतली होती. या लाटेतही देशातला सर्वाधिक रुग्णांचा आकडा महाराष्ट्रातून असला तरी हळुहळू राज्यात परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात महाविकास आघाडी सरकारला यश येताना दिसतंय.

स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नीती आयोगालाही महाराष्ट्रातील कोविड प्रतिबंधक नियोजनाचं कौतुक करावं लागलंय. दरम्यानच्या काळात सरकारची सर्व बाजूंनी कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेली महाराष्ट्र भाजपा वरिष्ठांच्या कौतुकाने तोंडावर पडलीय.

महाराष्ट्र भाजपा सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत कमी आणि मुख्यमंत्र्यांना मानसिकदृष्ट्या अस्थिर ठेवून त्यांना काम करू न देण्याच्या खोडसाळ भूमिकेतच अधिक दिसली. इथे सरकारातील सहकारी पक्षांपेक्षाही मुख्यमंत्र्यांना पाठबळ कोणाचं मिळालं असेल ते शिवसेना संघटनेचं !

ऑनलाईन संबोधनात महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे मोठ्या कौशल्याने शिवसैनिकांना नेमका संदेश देतात आणि संघटना कामाला लावतात, हे फार कमी लोकांना माहितीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चेहरा संयमी असला तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं कामही जोडीला आहेच. दिवसेंदिवस समाजमाध्यमात शिवसेना अधिकाधिक आक्रमक होत चाललीय, ती तळागाळापर्यंत पोहचत असलेल्या सूचक संदेशांमुळेच !

भाजपाला ‘प्रत्युत्तर’ देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्र कोविडसंकटातून बाहेर पडण्याच्या प्रतिक्षेत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करणाऱ्या सोशल नेटवर्किंगवरच्या अकाऊंटची नोंद आमच्याकडे आहे, असं अनेक शिवसेना पदाधिकारी सांगतात !

सरकारी प्रशासन तर दिमतीला आहेच, पण राज्यभर सर्वदूर पसरलेला शिवसैनिक आणि त्यांचं कुटुंब हाही महाराष्ट्रातील जनतेचा मोठा हिस्सा असल्याने तिथूनच कानोसा घेत मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने कठोर निर्बंध लादले व तडीसही नेले.

आता पुन्हा महाराष्ट्राला निर्बंधांतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झालीय. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील शिवसेना संघटनेतून प्रतिसाद घेता घेता निर्बंधात शिथिलता आणण्यासाठीचं चाचपणीचं काम सुरू झालंय.

 

 

 

राज असरोंडकर

संपादक, मिडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!