कोयना प्रकल्पातील दुबार जमीनींचं वाटप रद्द करणार !

कोयना प्रकल्पातील दुबार जमीनींचं वाटप रद्द करणार !

कोयना प्रकल्पातील दुबार जमीनींचं वाटप रद्द करणार !

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

पुण्यामधील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात शासन सकारात्‍मक आहे. या अनुषंगानं पात्र खातेदारांचे संकलन तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्‍यात यावी. यासाठी विविध विभागांच्‍या कर्मचा-यांची सेवा घेत काम पूर्ण करावं, असं या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

चुकीच्या पद्धतीनं किंवा दुबार जमीन वाटप झाले असेल तर, जमीन वाटप रद्द करण्यात येईल, असा इशारा देतानाच सांगली, सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध जमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना देणं शक्य आहे का, याबाबत तपासून निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

ऊर्जा विभागाकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित बाबींबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल. सांगली जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भातही मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेत प्रश्नांच्या सोडवणुकीला गती द्यावी, असे निर्देश अजित पवारांनी यावेळेस दिले.

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!