गदारोळ : बिट्वीन द लाईन्स वाचायला हवा !

गदारोळ : बिट्वीन द लाईन्स वाचायला हवा !

गदारोळ : बिट्वीन द लाईन्स वाचायला हवा !

२० ऑगस्ट २०२१ रोजी डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाला ८ वर्षे पूर्ण झाली . काही प्याद्यांच्या अटका सोडल्या तर खुनामागील सूत्रधार अजूनही समाजात वर मान करून फिरतायत .

काल परवा चंद्रपूर जिल्ह्यात भानामतीच्या संशयावरून एकाच कुटुंबावर अख्ख्या गावाने हल्ला चढविला.

संभाजीराजेंनी पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाची हाक गेल्या आठवड्यात नांदेड मध्ये दिली. पुरात हातचं सगळं गमावलेल्यांना तुटपुंज्या मदतीने समाधान मानावं लागतंय. राज्यात जवळ जवळ १५० नगरपंचायती आणि नगर पालिकांचा कारभार गेल्या वर्षाभरापासून शासनाच्या प्रभाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. निवडणुकांचा पत्ता नाही.

केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवीमुळे OBC आरक्षणाचं भिजत घोंगडं अजूनही निपचित पडलय. सामाजिक तेढ , जातीयभेद, वाद अजूनही पाहायला मिळतायेत .

मी ज्या समाजातून येतो म्हणजे – भटक्या विमुक्त जाती जमाती – आमचे तर प्रश्न अजून पाटलावरच यायचे बाकी आहेत. अजूनही काही गावांमध्ये जातीवाद एवढा विकोपाला जातो कि तिथे खालची जात समजल्या जाणाऱ्यांच्या पार्थिवावर अंत्यविधीची परवानगी मिळत नाही. हा इतिहास नाही तर वर्तमानात हे घडतंय. तेही पुरोगामी महाराष्ट्रात.

एवढे सगळे प्रश्न सरकारांसमोर समोर असताना केंद्र असो कि राज्य , दोघेही सूड उगारण्यात आणि कुरघोड्या करण्यात मग्न असल्याचं चित्र आहे.

मुळात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा बघता बघता राणे विरुद्ध सेना वरून शिवसेना विरुद्ध भाजप आणि केंद्र विरुद्ध राज्य म्हणजेच ठाकरे विरुद्ध मोदी सरकार असा करण्यात भाजपला यश येताना दिसतंय. राणेंचं वक्तव्य कदापि समर्थनीय नाही, परंतु आजचा महाराष्ट्र शासन पुरस्कृत high voltage drama सुद्धा निंदनीय आहे.

कोण कुणाच्या सापळ्यात अडकलंय हे येत्या २-३ दिवसात स्पष्ट होईलच, परंतु महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी एकंदर धोक्याची घंटा नक्कीच वाजलेली दिसत आहे.

एवढं सगळं घडत असताना , “मी राणेंना किंमत देत नाही ” अशी शरद पवारांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.

असो, ना भूतो आणि आपण प्रार्थना करूया कि ना भविष्यती , असा हा प्रकार म्हणून TRP आणि त्यातून येणारे आर्थिक फायदे लक्षात घेता माध्यमं आपल्याला तेच तेच दाखवीत राहतील. आपल्याला फक्त त्या ओळींमधले खरे अर्थ समजून घ्यावे लागतील, राज्यशास्त्रच्या Read between the lines सारखं !

 

 

 

अक्षय तमायचेकर

सामाजिक कार्यकर्ता

akshaytamaychikar38@gmail.com

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!