अलिबागमधली वीज पूर्वपदावर येतेय…

अलिबागमधली वीज पूर्वपदावर येतेय…

अलिबागमधली वीज पूर्वपदावर येतेय…

अलिबाग तालुक्यातील अक्षी,नागाव, चौल, रेवदंडा हा भाग सर्वाधिक प्रभावित झालेला आहे. रोहा डिव्हिजन मधील मुरुड तालुका, तालुका, गोरेगाव डिव्हिजनमध्ये श्रीवर्धन, म्हसळा, दिवे आगार या भागात सर्वाधिक फटका बसलेला आहे. हे सर्व पूर्ववत व्हायला मेन एल टी लाईन आणि ट्रान्सफॉर्मर सप्लाय यासाठी ५-६ दिवस आणि तिथून पुढे प्रत्येक घरापर्यंत लाईन पोहोचायला ४-५ दिवस म्हणजे एकंदरीत १० दिवस लागणार आहेत, अशी माहिती अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता माणिकराव तपासे यांनी मिडिया भारत ला दिली.

अलिबाग आणि पेण असे जिल्ह्यातल्या दोन तालुके माझ्याकडे आहेत. जी काही हानी झालेली आहे ती म्हणजे जवळजवळ एस टी लाइनचे ८०० पोल, एल. टी लाईनचे २७०० पोल पडलेले आहेत. डीपी पडलेत. आता यातलं अलिबाग शहर जवळजवळ पूर्ण करत आलेलो आहोत, बाकीचे सब स्टेशन पैकी एक उद्या चालू होत आहे. बाकी इतर कुठल्या सब स्टेशनला तसा प्रॉब्लेम नाही, असं तपासे यांनी सांगितलं.

परंतु ज्या लाइन्स आहेत एसटी लाईन, एल टी लाईन, त्या सुरू व्हायला अजून वेळ लागेल. आता यामध्ये माझे २२५ ग्रामपंचायत आहेत त्यापैकी ७१ ग्रामपंचायतींना वीजपुरवठा सुरू झालेला आहे. अलिबाग शहराच्या संबंधित बोलायचं झालं तर जवळजवळ ९७ टक्के अलिबाग शहर पूर्ण उद्या पर्यंत पूर्णपणे चालू होईल. यासाठी लागणारे कंत्राटदार, मनुष्यबळ आता उपलब्ध होऊ लागलेला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शंभर कोटीच्या पॅकेजमधून महावितरणला किती निधी दिलाय असं विचारलं असता, त्यासंदर्भात नक्की माहिती नाही, कारण अद्याप ज्यांची घरं पडलेली आहेत, त्यांचे असेसमेंट सुरू आहे, असं ते म्हणाले.

News by Shalini Acharya

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!