समाजमाध्यमांतील अनागोंदीला प्रकाश आंबेडकरांची वेसण !

समाजमाध्यमांतील अनागोंदीला प्रकाश आंबेडकरांची वेसण !

समाजमाध्यमांतील अनागोंदीला प्रकाश आंबेडकरांची वेसण !

अॅड. प्रकाश आंबेडकरांनी समाजमाध्यमांतील अनागोंदीला वेसण घालण्यासाठी पावलं टाकली आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या नावाने उघडलेल्या सर्व अकाऊंटस्, ग्रुप्स, पेजेसचा ताबा पक्षाकडे देण्याचं आवाहन आंबेडकरांनी केलं असून, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. असं करणारे ते पहिलेच राजकीय नेते आहेत.

कोणीही कार्यकर्ता उठतो आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा प्रिय नेत्याच्या नावाने समाजमाध्यमांत अकाऊंट सुरू करतो, समूह बनवतो, पेज, ब्लाॅग सुरू करतो. सर्वसामान्यांना नेमकं अधिकृत कुठलं, हे समजायला कठीण जातं. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणांहून व्यक्त झालेली मतंही पक्षांची, नेत्यांची समजली जाऊन त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येतात. प्रकरण चिघळलं की मग राजकीय पक्षांना पुढे येऊन सदरचं मत पक्षाचं नसल्याचं स्पष्ट करावं लागतं.

अरविंद बनसोड आणि विराज जगताप यांच्या हत्येनंतर सोशल मिडियावर एका नव्या जातीय वादाला नव्याने सुरुवात झाली. दोन समाजात फुट पाडण्याचा समाजकंटकांनी पुरेपूर प्रयत्न केला. टिकटॉक, फेसबुक ह्या माध्यमांचा वापर करून लोकांनी नको नको ते पसरवण्याचा प्रयत्न केला.

काहीजण वंचित बहुजन आघाडीच्या नावाने आपले अकाऊंट उघडून जातीवाचक पोस्ट टाकत होते आणि सोशल मिडियावर त्याच पोस्टचा दाखला देऊन इतर जण वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला जातीयवादी पक्ष ठरवण्याचा प्रयत्नांत होते. हे प्रकरण इतक गंभीर होत गेलं की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॕड प्रकाश आंबेडकर यांना ह्यात लक्ष घालावं लागलं.

त्यांनी एक अधिकृत व्हिडिओ बनवून सांगितलं की अशा प्रकारे दोन समाजात फुट पाडणा-या फेसबुक आयडीवर त्वरीत कार्यवाही केली जाईल. लोकांनी अफवेला बळी पडू नये.

त्याचेच पुढचे पाऊल आता वंचित बहुजन आघाडीने उचलेले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी बनवलेले सर्व माध्यमांवरचे अकाऊंट आता वंचित बहुजन आघाडी आपल्या ताब्यात घेणार आहे.आणि जे वैयक्तिक पक्षाच्या नावे अकाऊंट चालवत असतील आणि ते द्वेष पसरवण्याचे काम करत असतील तर अशा अकाऊंट वर तातडीने कार्यवाही होणार असल्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून दिला आहे.

यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत भूमिकेसाठी बाळासाहेब आंबेडकरांचे अधिकृत फेसबुक तसेच ट्विटर अकांऊंट किंवा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकांऊट ह्यावरुन पोस्ट करण्यात येईल अन्यथा इतर कुठल्याही अकाऊंटवरच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीची अधिकृत भूमिका समजू नये, असंही त्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

News by Ankush Hambarde Patil


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!