लाॅकडाऊनमध्ये बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या तग धरून राहता आलं पाहिजे !

लाॅकडाऊनमध्ये बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या तग धरून राहता आलं पाहिजे !

लाॅकडाऊनमध्ये बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या तग धरून राहता आलं पाहिजे !

राहुल गांधी यांनी बुधवारी हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर, ग्लोबल हेल्थ चे संचालक आशिष झा आणि स्वीडनचे प्रोफेसर संसर्गजन्य आजारांच्या संकटांचे अभ्यासक, जागतिक आरोग्य संघटनेतील सल्लागार सदस्य जोहान जिसिके यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाऊन काळात राहुल गांधी हे जगभरातल्या तज्ञांशी भारतातल्या विविध विषयांवर संवाद साधत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज गांधींनी दोन जगप्रसिद्ध आरोग्य तज्ञांशी संवाद साधला आहे. राहुल गांधी ह्यांनी कोणते महत्वाचे प्रश्न विचारले आणि काय उत्तरे मिळाली ते पाहूयात.

ह्या संवादातले महत्वाची प्रश्नोत्तरे-

१) लॉकडाऊनबद्दल तुमचे काय मत आहे? आणि लॉकडाऊनचा मानसशास्त्रावर काय परिणाम होतो,तसेच ते किती अवघड आहे?

आशिष झा – लॉकडाऊन करोना संक्रमणाचा वेग निश्चित कमी करते, त्याचं पालन व्यवस्थित झालंच पाहिजे. संक्रमित व्यक्तीला समाजापासून दूर ठेवणं गरजेच आहे. लॉकडाऊन लोकांच्या सहन करण्याच्या क्षमता वाढवू शकतं. जर माणसांनी अशा काळात क्षमता वाढवल्या नाहीत तर मानसिक पातळीवर मोठ्या धोक्याला सामोरे जावं लागेल. माणसांची क्षमता कमी झाली तर त्याचा मोठा परिणाम अर्थशास्त्रावर होईल. त्यामुळे लोकांनी ह्या काळात बौद्धिक पातळीवर सक्षम असण गरजेच आहेच; त्याचबरोबर शारिरीक काळजी घेऊन आरोग्यसंपन्न असायला हवं.

२) लॉकडाऊनचा मजुर, कष्टकरी लोकांवर काय परिणाम होतील ?

आशिष झा – करोना महामारी ही एक-दोन महिन्यात संपणारी नाही, ह्यातून पूर्णतः बाहेर येण्यासाठी २०२१ साल यावं लागेल. अशा काळात शासनाने मजुरांना जास्तित जास्त मदत कशी करता येईल ह्यावर फोकस रहावं, मजुरांना विश्वास द्यावा आज परिस्थिती कठीण आहे ह्या काळात सरकार तुमच्या सोबत आहे. उद्याचा काळ नक्कीच चांगला असेल.

३) टेस्टिंगची रणनीती काय असायला हवी?

आशिष झा – ह्या काळात दवाखान्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक चाचणी गरजेची आहे.जास्तित जास्त टेस्ट होणे ही काळाची गरज आहे.टेस्टिंग बाबत जगभरात ताईवान – दक्षिण कोरियांनी उत्कृष्ट काम केलेल आहे.

४) भारतातील तरुण मधुमेह, अस्थमा, इतर आजार असणा-या लोकांनी ह्याचा सामना कसा करायला हवा?

आशिष झा – तरुणांनी हा विचार सोडून द्यावा की मी पूर्णतः स्वस्थ आहे, म्हणून मला करोना होणार नाही. जी काळजी घ्यायला सांगितली, ती घ्यायलाच हवी. ज्यांना आत्यवश्यक सुविधेत काम कराव लागतं, त्यांनी विशेष काळजी घ्यावी.त्याच्यासाठी सरकारनेही पूर्ण सुविधा पुरवाव्यात.बाहेर फिरणारा तरुण घरातील रोगी असणाऱ्या एखाद्यासाठी धोकादायक ठरु शकतो. न्यूयार्कच्या अभ्यासावरुन असं लक्षात आलं की बाहेरुन घरात येणारे युवक हे करोना संक्रमनासाठी ब-याच अंशी कारणीभूत होते आणि धोकादायक परिस्थिती निर्माण केली.

५) उन्हाळ्यात करोनाचा प्रभाव कमी होतो?

आशिष झा – निश्चित आताच काही सांगता येणार नाही; पण काही संशोधकांचा असा दावा आहे.

६) वैक्सीन बद्दल काय सांगाल? कधी पर्यंत येऊ शकेल?

आशिष झा – जगातील तीन देशांकडून आशा आहे तसे प्रयत्नही चालू आहेत. भारताला ह्यासाठी तयार रहाव लागेल, कारण लागणाऱ्या वैक्सीनची संख्या ५० करोडच्या घरात असेल.

राहुल गांधी आणि प्रोफेसर जोहान जिसिके यांच्यातील संवाद

१) युरोप मध्ये काय परिस्थिती असेल? पुढील रणनीती काय आहे?

प्रोफेसर जोहान – युरोपात आजाराचं संक्रमण थांबलेलं नाही, पण हा आजार ९९% लोकांवर सामान्य आजाराप्रमाणेच परिणाम करू शकला. १% लोकांना ह्याच्या गंभीर परिणामाला सामोरे जावं लागलं आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरी कुठलीच रणनीती सध्या जगभरात कुठेच नाही,संक्रमण साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एक मार्ग सध्या तरी आहे. पण अर्थव्यवस्थेचं नुकसान टाळण्यासाठी लॉकडाऊन प्लान B तयार असणे गरजेच आहे. कुठे सुट द्यायची कुठे कडक करायचं, ह्याचं प्रशासकीय नियोजन करायला हवं.अर्थचक्र फिरत रहाण्यासाठी मोठी तयारी आणि नियोजन लागणार आहे.

२) अशा काळात भारताने आर्थिक मोर्चावर कसं लढायला हवं?

प्रोफेसर जोहान – भारत लोकसंख्येच्या बाबतीत विशाल देश आहे. भारताला फार काळ लॉकडाऊन करुन ठेवाव अशी परिस्थिती अजिबात नाही. अर्थव्यवस्था आणखी ठप्प करणं हे उद्यासाठी धोकादायक आहे, त्यामुळे भारताने हळूहळू हालचाली सुरु कराव्यात. सक्षम युवकांना कामावर रुजू करावं, कारण त्यांची प्रतिकारक शक्ती अधिक असते. वयस्क लोकांना घराच्या बाहेर पडू देऊ नये. हळूहळू बाहेर पडण्याचा विचार भारताने करायला हवा. अन्यथा फार मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावं लागेल.जिथे मजुरांची संख्या जास्त आहे, तिथे काम बंद ठेऊन चालणार नाही. अन्यथा उपासमारीचाही सामना करावा लागेल. एकाच वेळी उपासमार,आरोग्य,आर्थिक संकट ह्या तीन आघाड्यावर भारताला लढावं लागेल, त्यामुळे आणखी लॉकडाऊन करताना बाहेर पडण्याचा प्लानही तयार करावा, नियोजन करावं

News by MediaBharatNews Team

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!