लोकांना कर्ज नको, थेट खात्यात पैसे जमा करा ! राहुल गांधींचा मागणीचा पुनरुच्चार !!

लोकांना कर्ज नको, थेट खात्यात पैसे जमा करा ! राहुल गांधींचा मागणीचा पुनरुच्चार !!

लोकांना कर्ज नको, थेट खात्यात पैसे जमा करा ! राहुल गांधींचा मागणीचा पुनरुच्चार !!

केंद्र सरकारने ज्या पॕकेजची घोषणा केलीय ती कर्ज स्वरुपात आहे. ती तशी असायला नको होती.देश एका मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना सरकारने गरीब, मजूर, शेतकरी ह्यांना केंद्रस्थानी ठेऊन थेट पैसे त्यांच्या बॕक खात्यावर जमा करुन त्यांच्या हातात पैसा द्यायला हवा होता, असं मांडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सुरुवातीपासून करत असलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.

राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ लिंकद्वारे पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी खालील मुद्यांकडे सर्वांच लक्ष वेधलं. पुढे बोलताना गांधी असंही म्हणाले की एवढ्या कठीण काळात भारत मातेने आपल्या मुलांसोबत सावकारासारखा व्यवहार करता कामा नये. पैसा कर्ज स्वरुपात न देता हे पॕकेज थेट मदतीवर अवलंबून असायला हवं होतं, कारण ह्यावेळी लोकांना पैशाची अधिक गरज आहे. पैसा हातात असेल तर अर्थचक्राला अधिक गती प्राप्त होईल.

आपली वित्तिय तूट वाढली तर बाहेरील एजेंसीज् आपली रेंटिंग कमी करतील, ह्याचा ह्याक्षणी सरकारने अजिबात विचार करू नये. आपल्या देशाच रेंटिंग कायम मजूर, शेतकरी कामगार वर्गावरच निर्भर आहे, म्हणूनच आता फक्त त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल एवढच सरकारने पहावं. त्याचबरोबर इतर रोगांनी ग्रस्त असलेले लोक तसेच वृद्ध लोकांकडेही विशेष ध्यान देण्याची गरज आहे.

त्यामुळे सरकारने आर्थिक पॕकेजचा पुनर्विचार करून कर्ज स्वरुपात न वाटता थेट मदत स्वरुपात पैसा पुरवावा, अशी विनंती राहुल गांधी ह्यांनी शासनाला केली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!