अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील राज ठाकरेंच्या खेळीचा अर्थ काय ?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील राज ठाकरेंच्या खेळीचा अर्थ काय ?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील राज ठाकरेंच्या खेळीचा अर्थ काय ?

भारतीय जनता पक्षानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू नये आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे.


आमदार रमेश लटके ह्यांच्या निधनानंतर अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

राज ठाकरेंनी रमेश लटकेंचं कौतुक करताना म्हटलंय की रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल, असं राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं आहे.

राज ठाकरेंच्या पत्राचे अनेक राजकीय अर्थ निघतात :

१. एकतर, राज ठाकरेंची भूमिका निव्वळ प्रामाणिक व राजकारणविरहित आहे किंवा
२. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मराठी विरूद्ध अमराठी अशी लढत आहे. अशावेळी मराठी माणसाच्या मनात मनसेबाबत कटुता येऊ नये, उलट मनसेला सहानुभूती मिळेल याची काळजी किंवा
३. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असलेले मतभेद आणि भाजपाशी असलेली जवळीक लक्षात घेता थेट पाठींबा न देता व तसं करून भाजपाचा रोष ओढवून न घेता मराठी मतांचं विभाजन टाळून ऋतुजा लटके यांना अप्रत्यक्ष पाठबळ किंवा
४. भाजपाला पराभव स्पष्ट दिसत असल्याने आवाहनातून निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या माघारीचा मार्ग सोपा करणे व भाजपाविरोधात महाराष्ट्रभर वाढू लागलेल्या असंतोषाला रोखणे व ऋतुजा लटकेंच्या विजयात मनसेचा श्रेयाचा वाटा राखून ठेवणे.

अर्थ काही जरी निघाला तरी राज ठाकरे यांनी आपल्या पत्राने मुत्सद्दी खेळी केली असून एकाच दगडात अनेक गोष्टी साधल्या आहेत, असं दिसतं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!