राजन इंदुलकर : ऊर्जेचा नायझरा

राजन इंदुलकर : ऊर्जेचा नायझरा

राजन इंदुलकर : ऊर्जेचा नायझरा

कोकणात गेली २२ वर्षे कातकरी पाड्यांवर शाळा चालवणे, शेतीतील विविध प्रयोग ते सह्याद्री पट्ट्यातील जंगलतोड थांबवण्यासाठीचे अविरत प्रयत्न अशी राजन इंदुलकर यांच्या कामाची मोठी व्याप्ती आहे. कोकणात सामाजिक चळवळीत काम करताना मानसिक व शारीरिक हल्ल्यांना कशाप्रकारे समोर जावं लागतं, या सर्व अनुभवांचे डोस मिळतात सरांसोबत काम करताना.

सह्याद्री पट्ट्यात राहणाऱ्या कातकरी-धनगर समाजातील शिक्षित पहिली पिढी सरांच्या प्रयत्नांमुळे उभी राहिली. थेट आर्थिक मदतीपेक्षा, शिक्षण आणि कष्ट करून सक्षम करणं हा सरांनी कामाचा पायंडा ठेवला. गाणे खडपोली MIDC व लोटे MIDC प्रदूषणाबाबत त्यांनी खूप आंदोलनं केली, कायदेशीर लढे दिले, काहीवेळा यश मिळालं, स्थानिकांच्या उदासीनतमुळे काही आंदोलनातून माघार घ्यावी लागली, पण आज देखिल कामाच्या वेळी असलेला उत्साह आणि कोकणातली समस्येबाबत त्यांची तळमळ आम्हांला सदैव प्रेरणादायी आहे.

कोकणातली बेटा बेटावर असलेल्या समस्या व या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांच्यात एकसूत्रता यावी म्हणून कोकणातले तरुण काही मुलं एकत्र आली. पहिल्या मिटिंगच्यावेळी सर उपस्थित होते त्यांनीच आमच्या समितीला नावं सुचवलं, “निरंतर कोकण कृती समिती”.

हल्लीच राजन सरांच्या सोबत दीर्घ रात्र ते पहाटे पर्यँत अनेक कोकणातल्या विषयांवर चर्चा झाली होती. तरूण वयात त्यांनी केलेल्या संघर्षातील अनुभवातून पुढील कृतीसाठी आवश्यक बाबी यांबाबत मला मार्गदर्शनही केलं होत. राजन सर म्हणजे “ऊर्जेचा अखंड स्रोत” एवढंच एका शब्दांत मांडता येत.

निरंतर कोकण कृती समितीच्या सभांच्या निमित्त ग्राऊंडला एकत्र फिरताना, वाड्यावस्तीनवर सरांसोबत बैठका घेताना, सोबतच्या प्रवासात खूप गप्पा होतात, कोकणाबद्दलची तळमळ आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची त्यांची जिद्द आम्हाला प्रेरणा देत असते.

– पंकज शोभा दळवी

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!