करोना काळात प्लाझ्माची कुर्बानी !

करोना काळात प्लाझ्माची कुर्बानी !

करोना काळात प्लाझ्माची कुर्बानी !

करोना आजारामधून बरे झालेल्या लोकांनी करोनाग्रस्त रुग्णांसाठी प्लाझ्मा डोनेशन करावे असे आवाहन बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम तरुणांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्लाझ्मा डोनेशनचे सर्वांना आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून या मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेतला आहे.त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक.

बकरी ईद हा सण आपल्याला सर्वाधिक प्रिय असलेली गोष्ट दान करावी, यासाठी आहे. त्यामुळे राष्ट्र सेवा दल सैनिकांनी प्लाझ्मादानचं उचललेलं पाऊल निश्चितच प्रशंसनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव अल्लाउद्दीन शेख यांनी दिली आहे.

ही कल्पना सुचली ती सामाजिक भान असणाऱ्या मुंबईतील शमा सय्यद या माझ्या बरोबर बँकेत काम करणाऱ्या माझ्या सहकारी मैत्रिणीला. मग तिने मालाडच्या निसार अली या राष्ट्र सेवा दलाच्या संघटकाला ही कल्पना सांगितली.

सेवा दलाची पूर्णवेळ कार्यकर्ती सिरत सातपुते आणि सुभाष वारे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांना ही कल्पना आवडली. महाराष्ट्राचे सचिव नचिकेत कोळपकर, संजय रेंदाळकर यांनी त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांना जोडून दिले आणि मग ही कल्पना कार्यान्वित झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी ही कल्पना उचलून धरली.

गेली तीन चार वर्ष ही तरुण मंडळी बकरी ईदला कुर्बानी मधील काही रक्कम सामाजिक कामासाठी दान करा असे आवाहन करीत होती त्याला प्रतिसाद ही चांगला मिळत होता.

दुष्काळी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडे लावण्याच्या उपक्रमासाठी ही रक्कम एका वर्षी सुपूर्द करण्यात आली. केरळला पूर आल्यानंतर त्या वर्षी मदत देण्यात आली तर गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूर भागात पूर परिस्थिती आल्यावर त्या लोकांना मदत दिली गेली.

यातले अनेक जण राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत तर काही जण त्या त्या समाजात प्रबोधनाचे काम करीत आहेत. या निमित्ताने या तरुणांची मोट बांधली गेली. या निमित्ताने ही नवी वाट दाखवलेल्या तरुण – तरुणीचे अभिनंदन करीत असताना, करोना आजारातून बरे झालेल्या सर्व रुग्णांनी इतर करोना पेशंट साठी प्लाझ्मा डोनेशन करावे, असे आवाहन करीत आहे.

 

शरद कदम

कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!