यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांच्या भेटीला येतायेत सीडस् मोदक !

यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांच्या भेटीला येतायेत सीडस् मोदक !

यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांच्या भेटीला येतायेत सीडस् मोदक !

राष्ट्र सेवा दलाच्या गोरेगाव विभागातर्फे यंदा पर्यावरणाला पूरक अशा ” ना तुमचं ना माझं पर्यावरण आहे आपल्या सर्वांचं ” ह्या उपक्रमांतर्गत मातीमध्ये नैसर्गिकरित्या खत आणि त्यामध्ये बी टाकून तयार केलेले मोदक लोकांच्या भेटीला येत आहेत.

हे मातीचे विशेष मोदक गोरेगावातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनीच तयार केलेत. खत मिश्रित मातीत विविध झाडांच्या बिया घालून असे १ हजार मोदक तयार करून वितरित करायचं लक्ष्य त्यांनी ठरवलंय. विशेष म्हणजे शाळकरी मुलांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलंय.

कोकणात पूरस्थिती होतीच, पण अनेक ठिकाणी भूस्खलन झालं. डोंगराला भेगा पडल्यात. याठिकाणी या मोदकांचा नैवेद्य वसुंधरेला अर्पण करायला राष्ट्र सेवा दलाचे युवा जाणार आहेत. पुन्हा नवे अंकूर फुलवणं हे कोणत्याही पुजेअर्चेपेक्षा महान आहे, ही त्यांची भूमिका आहे.

दोन वर्षांपूर्वी तेजस साळसकर या युवकाने सीडस् मोदकांची संकल्पना राबवली होती. राष्ट्र सेवा दलाच्या गोरेगाव शाखेने ती विस्तारली आहे.

गणपतीच्या एका प्रचलीत कथेत वसुंधरेला आईची उपमा देण्यात आलीय. सणांच्या गोंगाटात सामाजिक आशयांचंही स्खलन होवून गेलंय. या पार्श्वभूमीवर या डोळस सेवा दल सैनिकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमात उमटलीय.

पूरग्रस्त भागात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.. त्यामुळे लोंकांच्या मनात प्रचंड निराशा निर्माण झाली आहे… त्यासाठी हा सीडस् मोदक एक नवी उमेद असू शकतो पुन्हा नव्याने साम्राज्य उभे करण्यासाठी…म्हणून पुढचे काही दिवस किंवा महिने जसं शक्य असेल, तेवढं नव्याने लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहोत..असं राष्ट्र सेवा दलाची गोरेगाव विभाग संघटक ज्योती बामगुडे यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.

मुंबईतही सीडस् मोदक हा उपक्रम एक गणपती एक मोदक असा सुरू झालाय. जेणेकरून त्या मोदकाच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे, असं ज्योती बामगुडे म्हणाल्या.

प्रत्येक मोदकात एका वृक्षाच्या बियां, या पद्धतीने हजार मोदकांत वेगवेगळ्या वृक्षांच्या बियां असतील. वृक्षांच्या जाती व पूरक वातावरणाच्या गरजेनुसार, मोदकांचं वर्गीकरण झालंय. मुंबई, ठाणे किंवा कोकणात तिथलं पूरक हवामान लक्षात घेऊन त्या त्या वृक्षांच्या बियां असलेल्या मोदकांचं वितरण केलं जाणार आहे, अशी माहितीही ज्योती यांनी दिली.

पूरग्रस्त कोकणात राष्ट्र सेवा दलाच्या तरूणांनी खूप काम केलंय. त्यांच्या सोबत चर्चा करत असतानाच सीड-मोदकाची ही कल्पना समोर आली. त्या सगळ्यांनी मेहनतीने हे मोदक तयार केले. आता कोकणात डोंगरांच्या भेगा भरायला ही तरूण मुलं जात आहेत. रागावलेल्या निसर्गाला हेच अर्ध्य शांत करेल. मला वाटतं गणेशोत्सवात याहून दुसरं काही पवित्र नसेल… या तरूणांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे.

युवराज मोहिते, पत्रकार

चिपळूणला तळीये गावी राष्ट्र सेवा दलाची युवा टीम मोदक घेऊन जाणारेय. तिथल्या स्थानिकांना सोबत घेऊन बीजारोपण केलं जाणार आहे. पूरग्रस्त कोकण नव्याने उभं राहत असताना निसर्ग संवर्धनात आम्हीही तुमच्या सोबत आहोत, हा संदेश ही युवा टीम देऊ पाहतेय.

मोरया !!!

संपर्क : कृपेश कांबळे, कार्याध्यक्ष | ज्योती बामगुडे, विभाग संघटक 7045446357 | स्वप्नाली गोंधळी, जिल्हा प्रतिनिधी 80978 23222

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!