ले मशाल निकल पडे है हम मैदानमें !!!

ले मशाल निकल पडे है हम मैदानमें !!!

ले मशाल निकल पडे है हम मैदानमें !!!

मनापासून अभिनंदन, रविशकुमार!! आणि मनापासून धन्यवादही !! तरुणपणी चळवळीत एक हिरो लागतो तसाच मध्यम वयातही एक नैतिकता वाढवणारी व्यक्ती आसपास हवीशी वाटते. रविशकुमार असाच एक हिरो. डोक्याला कफन बांधून बाहेर पडणा-यांतला एक. निर्भिड पत्रकारितेचा एक संयत नमुना. अत्यंत चिड आणणा-या वातावरणात शांतपणे पत्रकारिता करणारा.


रविशकुमारच्या संयत शांतपणात असलेला सत्याचा आग्रह आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणाचा सत्ताधा-यांवर दबाव इतका आहे की सरकारला प्रत्येक कृती करताना रविशकुमार आठवत असेलच. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सरकारच्या कृतीची माहिती आणि वस्तुस्थितीची जाणीव इतकी वस्तुनिष्ठपणे रविशकुमारकडून मिळते की त्याने व्यवस्थेला विचारलेल्या प्रश्नांत आपणही कधी सामिल होतो हे कळत नाही इतका माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर रविशकुमारचा प्रभाव आहे.

आज रविशकुमारला घोषित झालेलं मॅगेसॅसे अवार्ड रविशकुमारच्या पत्रकारितेला जागरुक जगाने दिलेलं बळं आहे. एका मोठ्या आवर्त पोकळीत आपण झपाट्याने ओढले जात आहोत. अशा भयावह परिस्थितीत सातत्याने सत्य समाजासमोर आणण्याचं काम रविशकुमार सारख्या जागल्याने निर्भिड निरपेक्षपणे केलेलं आहे.

आज ‘आपण सारे रविशकुमार’ असं आपल्याला वाटत असलं तरी आपल्यातून असंख्य रविशकुमार पुढे येण्याची गरज आहे. मशाल घेऊन रविशकुमार कधीचाच निघालाय, आता आपली वेळ आहे दटून पुढे जाण्याची, हा कारवाँ विस्तारत नेण्याची !!

 

– सिरत सातपुते

(लेखिका राष्ट्र सेवा दलाच्या पूर्ण वेळ कार्यकर्ता आहेत.)

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!