रिल लाईफ विलन..रिअल लाईफ हीरो म्हणतो, मजदूर तर राष्ट्राच्या ह्रदयाचं स्पंदन !

रिल लाईफ विलन..रिअल लाईफ हीरो म्हणतो, मजदूर तर राष्ट्राच्या ह्रदयाचं स्पंदन !

रिल लाईफ विलन..रिअल लाईफ हीरो म्हणतो, मजदूर तर राष्ट्राच्या ह्रदयाचं स्पंदन !

भारतीय जनमाणसांवर तीन क्षेत्रातल्या लोकांच मोठ गारुड कायम राहिलेल आहे क्रिकेटर,अभिनेते, राजकारणी, ह्या तीन क्षेत्रातील लोकांना अक्षरशः देवाच्या रांगेत आपण बसवतो. काहींची मंदीरं उभी राहिली, काहींचे फोटो देवघरापर्यंत पोहचले, काहींच्या फोटोला आजही मोबाईलच्या स्क्रीनवर, टिशर्टवर, घरातल्या भिंतीवर स्थान आहे. पण संकटात प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे खूप थोडे सेलिब्रीटी ह्या देशाने पाहिलेत. इतर प्रदेशातील अभिनेत्यांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेते जमीनीवर, थेट लोकांच्या मध्ये जाऊन काम करणे, लोकांना थेट मदत पोहचणे ह्या फ्रंटवर कायम आघाडीवर असतात. असाच एक मुळचा पंजाबचा पण कारकीर्दीची सुरुवात दाक्षिणात्य सिनेमातून करणारा कालांतराने बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमवणारा अभिनेता (अभिनेता म्हणजे फक्त लीड हीरो असा समज आपल्याकडे फार आधीपासूनचा आहे) त्यामुळे ह्या पीढीचा रिल विलन सोनू सुद !

ज्या ज्या वेळी देश कठीण परिस्थितीतून जातो त्या त्यावेळी रिल वर विलन साकारणारे लोकंच ख-या आयुष्यातले हीरो ठरताना आपण नेहमी पहातो. अभिनेते सयाजी शिंदे असतील, निळू फुले, सदाशीव अमरापूरकर असे कित्येक नावं आपल्याला घेता येतील. त्यात आता सोनू सूद या नावाची भर पडलीय.

रोजगाराच्या शोधात आपलं मूळ गांव सोडून हजारो किलोमीटरवर विखूरलेले मजुर, ज्यांचा रोजगार एका झटक्यात बंद झाला, हातातलं काम गेल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, राहायची सोय नाही की खायला एकवेळचंही अन्न नाही! कोणी एकट्याने तर कोणी कुटुंबासहीत वेगवेगळ्या शहरात अडकून पडलेले ! त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि मग सुरू झालं देशातल सर्वात मोठं स्थलांतर.

मग अशा वेळी मजुरांच्या मदतीसाठी उभा राहतो एखादा सोनू सूद. एकट्याच्या बळावर आतापर्यंत जवळपास २५०० मजुरांना घरी पोहचवणारा देवदूतच. मजुरांसाठी बसेस उपलब्ध करुन देऊन अगदी नियोजनबद्ध त्यांना घरी पोहचवणारा सोनू एखाद्या आदर्श प्रशासकाप्रमाणे लोकांना मदत करताना पाहून थक्क व्हायला होतं. जे काम सरकारचं आहे ते काम एखादा अभिनेता स्वत:च्या अंगावर घेऊन करतो. त्यावेळी देशात अजून संवेदना जागी असणारी माणसे आहेत ह्यावरचा विश्वास अधिक ठाम होतं जातो.

उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार येथे सोनूच्या बसेस मजुरांना घेऊन पोहचल्याही आहेत. नुसता प्रवासच नाहीतर हा माणूस त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करतोय. सोनूच्या बसेस अजून थांबल्या नाहीयंत. जोपर्यंत शेवटचा मजुर घरी पोहचणार नाही तोपर्यंत ही मदत अशीच सुरू राहिल, असं सोनू म्हणतो.

मजुरही शासनापेक्षा सोनूकडे आशेने पहाताना आता आपल्याला दिसून येतं हे शासनाचं आपयश आहे की सोनूचं यश?

सोनू सूदच्या कामाची तत्परताही इतकी आहे की प्रशासनाच्याही माना झुकाव्यात. कोण कुठला मजूर सोनू सूदला थेट कॉल करतो आणि सोनू त्याला विश्वास देतो ‘काम हो जाएगा, निश्चिंत रहो मेरे भाई’ ! एखादा मजुर सोनूला ट्विट करतो ‘सोनू भाई हम मजुर लोग है, हम मुंबई में फसे है हमें बिहार अपने गॉंव जाना है’ लगेच सोनू त्यांना रिप्लाय करतो, “तुम कल निकलोगे, सुबह का नाष्टा अपने घर पर करोगे’

असे हजारो ट्विट तुम्हाला त्यांच्या ट्विटर अकांउट वर पाहता येतील. सोनू एखादं सरकार आहे आणि लोक त्याच्याकडे मदत मागत आहेत आणि तो एखाद्या उत्तम प्रशासकाप्रमाणे फक्त आश्वासन न देता मदतही करतोय असं दिसून येतं. मजुरांच्या डोळ्यातला आनंद इतका जिवंत क्वचितच दिसतो. एक मजुर तर लिहतो “मैंने आज भगवान देखा हैं”

एखाद्याची मदत दुस-याला जगण्याचं बळ देण्याची ही करोनाकाळातील जगातील एकमेव वेळ असावी आणि ही मदत एक सामान्य अभिनेता करतो आहे. ह्याचा अभिमान बाळगावा की ७० वर्षात आपला देश अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य ह्या भोवतीच फिरतोय ह्याची लाज?
नुसती मजुरांना मदत करुनच हा माणूस थांबला नाही तर भिवंडीतील स्थानिक मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था असेल, डॉक्टरांसाठी १५०० PPE कीटची मदत असेल त्याचबरोबर आपलं मुंबई स्थित हॉटेल डॉक्टरांच्या, मेडिकल कर्मचा-यांच्या निवासासाठी उपलब्ध करुन देणं असेल असे अनेक उल्लेखनीय चांगली कामं ह्या काळात त्यांनी केली आहेत.

मिशन वंदे मातरम् मध्ये ज्या तत्परतेने सरकारने पाऊले उचलली आणि परदेशात असलेल्या नागरिकांना भारतात आणलं तितकीच उदासिनता देशातल्या मजुर, कष्टकरी वर्गाबाबत दाखवली. पण मजुरांच्या पाठीमागे ठाम पणे उभा रहाणारा सोनू नसेलही बॉलीवूडचा महानायक, नसेलही बॉलीवूडचा किंग, मिस्टर परफेक्शनिस्ट किंवा नसतीलही त्याच्या नावावर असंख्य पुरस्कार.

सोनू मजुरांच्या ह्रदयातला महानायकही आहे, त्यांच्या मदतीला धावून जाणारा किंगही आहे आणि गरज असताना संवेदना जिवंत असलेला मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि त्याच्या नावावर जमा झाले आहेत घरी पोहचलेल्या मजुरांच्या आशिर्वादाचे हजारो पुरस्कार !

ब-याच चित्रपटात त्याला आपण विलन साकारताना पाहिलंय. एकदा त्याच्या ट्विटर अकांउटला भेट द्या! तुम्हाला आज तो जमीनी हीरो साकारताना पहायला मिळेल. करोना महामारीच्या काळात सगळीकडे मजुरांचे हाल होतानाचे चित्र दिसत आहेत. पण सोनूचं ट्विटर अकांऊट पहा. तुम्हाला आशादायी चित्रं पहायला मिळतील. जगभरातून आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘परसो माँ की गोद में सोएगा भाई’ असा विश्वास देणारा सोनू सूद एकाच वेळी नैतिकदृष्ट्या मजुरांसाठी राज्य सरकारही आहे आणि केंद्र सरकारही तोच आहे. सोनू सूद करत असलेल्या कामाला मिडिया भारत न्यूजचा मानाचा सलाम.

News by Ankush Hambarde Patil

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!