ऋतिक रोशनच्या शिकायचाय कोविडडान्स !

ऋतिक रोशनच्या शिकायचाय कोविडडान्स !

ऋतिक रोशनच्या शिकायचाय कोविडडान्स !

शिकण्याची इच्छा आणि विनम्रता असली की जगातून कुठूनही कोणाकडूनही काहीही शिकता येतं. बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन यांनी एक विडिओ रिट्वीट करून, त्यात सुरू असलेला ‘कोविडडान्स’ शिकण्याची इच्छा व्यक्त केलीय.

आसाममधील डॉक्टर सय्यद फैझान अहमद यांनी हा विडिओ ट्वीट केलाय. विडिओत एक व्यक्ति पीपीई किट घालून डान्स करतेय. डॉ. सय्यद यांच्या म्हणण्यानुसार, ती व्यक्ती कोविडरुग्णांच्या आनंदासाठी हे करतेय. पण पीपीई किटमधील व्यक्ति कोणी व्यवसायिक नृत्य कलावंत किंवा कोरिओग्राफर नसून, आसामच्या सिल्चर मेडिकल काॅलेजमधील डाॅक्टर अरुप सेनापती आहेत. ते इएनटी सर्जन आहेत.

अभिनेता ऋतिक रोशन यांनी तो विडिओ शेअर केलाय आणि लिहिलंय, डॉक्टरांना सांगा की मला ह्या स्टेप्स शिकायच्यात आणि त्यांच्याइतकंच चांगलं आसाममध्ये येऊन नाचायचंसुद्धा आहे. डॉ. अरुप यांच्याकडे जबरदस्त उर्जा असल्याचीही प्रतिक्रिया ऋतिक यांनी दिलीय.

ऋतिक रोशन स्वत: एक चांगले नृत्यकलावंत असून त्यांनी स्वत:ची अदाकारी विकसित केलीय. त्यांची प्रतिक्रिया कोविडकाळात जीव झोकून काम करणाऱ्या डाॅक्टरांप्रति कृतज्ञतेची आहेच शिवाय विनम्रतेचीही आहे !

डॉ. अरुप यांचा कोविडडान्स पाहण्यासाठी टिचकी मारा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!