मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मध्यप्रदेशातील एका निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची जीभ घसरलीय.
“आपला उमेदवार सरळ स्वभावाचा आहे. ‘त्यांच्या’सारखा नाही ! मी का त्यांचं नाव घेऊ ? माझ्यापेक्षा तुम्हीच त्यांना चांगलं ओळखता ! तुम्ही मला आधी सावध करायला हवं होतं ! ये क्या आयटम है ! ये क्या आयटम है….हां हां हां हां”…कमलनाथ यांचं वक्तव्य भाजपाच्या इमरती देवी यांना उद्देश्यून होतं आणि आता या उद्गारांवरून भाजपाने काँग्रेसवर हल्ला चढवलाय.
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी या वक्तव्याचा निषेध म्हणून मौन धारण केलंय ; तर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह कमलनाथ यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत. हाथरस घटनेवेळी भाजपा कुठे होती, आता ही नौटंकी बंद करा, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
“आयटम हा आपण सहजपणे वापरलेला शब्द असल्याचं म्हटलंय, तो इमरतींवर वाईट शेरेबाजी करण्यासाठी नव्हता, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय,” अशी प्रतिक्रिया देऊन माफी मागण्यास नकार दिलाय.
यावर #तुम्हालाकायवाटतं ? प्रतिक्रिया रकान्यात जरूर लिहा :
मुडमाॅर्निंग दुनिया ( बुलेटीन ६६ ) ऐकण्यासाठी टिचकी मारा :