शेती व्यवसायाला लागलाय अफवेचा रोग !

शेती व्यवसायाला लागलाय अफवेचा रोग !

शेती व्यवसायाला लागलाय अफवेचा रोग !

अफवा हा रोग असा आहे तो झाडून देशभरातल्या सगळ्या पीकांवर पसरतो. त्याला हवामान,भौगोलिक परिस्थिती, पाऊस, वारा, इ. कुठल्याही अनुकूल वातावरणाची गरज नाही तो कधीही, कसाही, केव्हांही तुमच्या माझ्या शेतापर्यंत येऊ शकतो. आता पाऊसाला सुरुवात झालेली आहे. खरीप हंगामाची तयारी शेतकरी करत आहेत. येणा-या काळात खरीप हंगामाचं नुकसान करणारा अफवा नावाचा रोग पीकांवर पडू नये इतकचं.

भाग तिसरा

आपल्या देशात विषाणूंच्या वेग जितका आहे त्यापेक्षा अफवांचा वेग अफाट आहे. कधी ह्या अफवा जाणिवपूर्वक पसरवल्या जातात, तर कधी विनोद निर्मितीसाठी ! कधी ह्या अफवा विकृत मानसिकतेतून निर्माण होतात तर कधी त्या देशातील सरकारचं अपयश झाकण्यासाठी अतिशय नियोजन पूर्वक पसरवल्या जातात. जो पर्यंत सत्याचा शोध लागतो, तो पर्यंत अफवेने फार मोठ नुकसान करुन झालेल असतं. सत्य घरातून निघेपर्यंत, असत्य जगभर हिंडून येते. अफवा जितक्या लोकांपर्यंत पोहचवल्या जातात सत्य त्या क्षमतेने पोहचत नाही !

ह्या अफवांचा थेट परिणाम होतो तो सामान्य जनमाणसांवर,भारतीय अर्थव्यवस्थेवर ! जेव्हा अशा अफवा पसरवल्या जातात तेव्हा सगळ्यात जास्त लोकांच्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, ह्याचा विचार करणे गरजेचं आहे. मुळात भारतीय समाज हा कृषक समाज आहे आणि अफवांचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर किती मोठ्या प्रमाणावर झाला !

अगोदरच कोरोना टाळेबंदी मुळे शेतक-यांचं आर्थिक गणित मोठ्या प्रमाणावर चुकलेलं आहे. त्यात त्यांच्या हातातील मोबाईलवर काय माहिती यावी, ह्यावर कोणतंही नियंत्रण नाही.

साधारणपणे कोरोनाने भारतात जेव्हा पाय पसरायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईलवर एक फॉरवर्डेड मेसेज झळकळा; ‘चिकनमुळे करोना होतो’ ह्या एका खोट्या माहितीने देशभरातला कुक्कुट पालन व्यवसाय अख्खा मोडकळीस निघाला. शेतीच्या सर्वात मोठा जोडधंद्यापैकी कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे.आज राज्यभरातील असंख्य शेतकरी कुक्कुटपालन करतात ; पण जानेवारी ते एप्रिलमध्ये ह्या धंद्याची पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. वर्षाकाठी राज्यभरात जवळपास ४०००-५००० कोटीची उलाढाल करणारा हा व्यवसाय आहे.

चिकन मुळे कोरोना होतो, ही गोष्ट वा-यासारखी पसरली आणि बाजारात कोंबड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. पुरवठ्यासाठी प्रचंड कोंबड्या शेतक-यांकडे तयार असताना मागणी शून्यावर आली. लोकांनी मांसाहार बंद केला आणि अक्षरशः कोंबड्यांना जंगलात सोडून देण्याची किंवा खड्डा करुन पुरण्याची वेळ शेतक-यांवर आली.

पर्यायाने अंडाविक्रीवर तर फारच मोठा परिणाम झाला. ८-९ रुपयाला विकलं जाणार एक अंड शेतक-यांना १ रुपयाला बाजारात विकावं लागलं आणि बरीचशी अंडी शेतातच सडून गेली. टाळेबंदी झाल्यामुळे हॉटेल, रस्त्यावरील भूर्जी,बिर्याणीचे दुकान बंद असल्यामुळे मागणीत अधिकची घसरण झाली आणि त्यात अशा अफवेमुळे घराघरात विकली जाणारी अंडीही विकली गेली नाहीत. ह्या अफवेचा इतका मोठा परिणाम झाला की कृषीमंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांना आदेश काढून ही अफवा थांबवावी लागली; पण तो पर्यंत फार उशीर झालेला होता.

क्रमश:

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!