माध्यमांच्या मुस्कटदाबीच्या काळात एक पत्रकार भाजपाला भंडावून सोडतो तेव्हा…

माध्यमांच्या मुस्कटदाबीच्या काळात एक पत्रकार भाजपाला भंडावून सोडतो तेव्हा…

माध्यमांच्या मुस्कटदाबीच्या काळात एक पत्रकार भाजपाला भंडावून सोडतो तेव्हा…

पत्रकारांना राजकारण करता येत नाही, पण संजय राऊत यांनी हा समज खोटा ठरवला, अशा आशयाचं ट्विट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलंय. संजय राऊत यांनी ते रिट्विट केलं आहे. आम्ही भरभरून मतं घेणार या टीव्ही नाईन ला दिलेल्या मुलाखतीच्या ट्वीटने संजय राऊत यांनी 23 ऑक्टोबरला सुरू केलेली बॅटिंग आज दहा दिवस उलटून गेले तरी तशीच जोरदारपणे सुरू आहे. पहिल्या बाॅलपासून फक्त चौकार आणि षटकार मारावेत, अशा पद्धतीने संजय राऊत व्यक्त होतायंत आणि आज ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

निकालांची प्रतिक्षा या मजकुरासोबत २३ आॅक्टोबरलाच संजय राऊत यांनी डोळे विस्फारलेल्या निग्रोंचा फोटो ट्वीट केला. २४ आॅक्टोबरला त्यांनी विनया देशपांडे यांचं ट्वीट रिट्वीट केलं. शिवसेनेच्या सहभागाशिवाय भाजपा एकटी सरकार बनवू शकत नाही, या संजय राऊतांच्या वक्तव्याचं ते ट्वीट होतं. सोबत सीएनएन-न्यूज१८ चा विडियो आहे, ज्यात आदित्य ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणताहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे.

२४ तारखेला निकाल लागले आणि २५ ला, संजय राऊतांनी गळ्यात घड्याळाचं लाॅकेट घालून कमळ हुंगणाऱ्या वाघाचं कार्टुन पोस्ट केलं आणि सोबत लिहिलं, व्यंगचित्रकाराची कमाल. बुरा न मानो दिवाली हैं. शिवसेनेचा पुढचा प्रवास खरं तर इथेच निकालाच्या दुसऱ्या दिवशीच स्पष्ट झाला होता.

 

२६ आॅक्टोबरला राऊतांनी मंजुल यांचं व्यंगचित्र पोस्ट केलं. एक अर्धा भरलेला ग्लास निवडणूक निकालाचं प्रतिक म्हणून दाखवलाय. चित्रात मोदी, शहा, उध्दव ठाकरे आहेत. मोदी म्हणतायंत, मी नेहमी म्हणत आलोय, ग्लास हा पूर्ण भरलेलाच असतो. अर्धा हवेने, अर्धा पाण्याने. त्यावर उध्दव म्हणतात…मग वरचा अर्धा ( हवेने भरलेल्या ) तुम्हाला घ्या, खालचा अर्धा मला द्या.

“सीएम पद पर भाजपासे तकरार के बीच शिवसेना ने की पवार की तारीफ, कहा- सत्ता का ‘रिमोट कंट्रोल’ उद्धव ठाकरे के हाथ में है” ही एबीपीन्यूज ची बातमी संजय राऊतांचं २७ आॅक्टोबरचं रिट्वीट आहे. …अन्यथा खेचाखेचीत महाराष्ट्राचं राजवस्त्र फाटेल, ही टीव्हीनाईन ची बातमी होती, त्यांचं २८ आॅक्टोबरचं ट्वीट.

२८ आॅक्टोबरलाच मुंबई तक चा पत्रकार कमलेश सुतार यांच्याशी बोलताना संजय राऊत म्हणतात, हरयाणात अपेक्षेपेक्षा कमी जागा भाजपाला मिळाल्यात. तिथे एकेकाळचा दुष्मन असलेल्या दुष्यंत चौटालासोबत भाजपाने सरकार बनवलंय.‌ आम्ही तर मित्रपक्ष आहोत. युती धर्म पाळणारे आहोत. पण देशासमोर मिडिया समोर भाजपा जे बोललीय ते पाळावं, इतकंच आमचं म्हणणं आहे. २८ लाच राऊतांनी विवेक कुलकर्णी यांचं ट्वीट पोस्ट केलंय. कुलकर्णी म्हणतात, राजकारणात संधीचं सोनं करण्याला महत्त्व आहे. निवडणुकीपूर्वी पूर्वी @PawarSpeaks यांनी केलं आणि निवडणुकीनंतर @rautsanjay61 तेच करु पाहतायंत.

२९ आॅक्टोबरला रिट्वीट केलेल्या एएनआय च्या बातमीत संजय राऊत म्हणताहेत, आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत. आमच्याकडे पर्याय आहेत, पण आम्ही ते पाप करू इच्छित नाही. भाजपाला सत्तेस्थापनेसाठी वेळ लागतोय, कारण इथे कोणी दुष्यंत नाही की ज्याचा बाप जेलमध्ये आहे.‌

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवं सरकार बनेल, ही स्वत:चंच विधान असलेली झीचोवीसतास ची बातमी राज्यांनी ३० आॅक्टोबरला पोस्ट केलीय. आणखी एक बातमी त्यांनी रिट्वीट केलीय, एएनआयची. महाराष्ट्राची कुंडली शिवसेना बनवणार. कोणते ग्रह कुठे ठेवायचे, कोणते तारे जमीनीवर उतरवायचे , कोणत्या ताऱ्यांना चमक द्यायची, हे ठरवण्याची ताकद आजही शिवसेनेत आहे. राऊतांचं हे वक्तव्य त्या बातमीत आहे. १०५ आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्री लाभत असेल तर एकदा पुन्हा संविधान वाचावं लागेल, हा टोला भाजपाला लगावताना आपल्याला संजय राऊत ३१ आॅक्टोबरच्या ट्वीटमध्ये मुंबई तकच्या बातमीत ऐकायला मिळतात.

३१ आॅक्टोबरला संजय राऊतांनी भाजपाला डिवचत प्रियांका गांधींची पोस्ट रिट्वीट केलीय. तमसो गा ज्योतिर्गमय हा श्लोक दादीसोबत आम्ही म्हणायचो, असं ते ट्वीट होतं.

१ नोव्हेंबरला संजय राऊतांनी भाजपाला उघड इशारा दिला की साहिब…मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..! त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत केंद्रस्थानी आल्याच्या बातम्या, भाजपाची तयारी नसेल तर शिवसेनेची सत्तास्थापनेची तयारी, १४५ चं बहुमत असल्याचा दावा अशा विविध वृत्तवाहिन्यांच्या बातम्या राज्यांनी रिट्वीट केल्यात.

३ नोव्हेंबरला अधिक आक्रमक होत, संजय राऊत म्हणतात, उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है …त्यासोबत ते जय महाराष्ट्र करायला विसरत नाहीत !! ४ नोव्हेंबरला त्यांनी उध्दव ठाकरेंसोबतचा फोटो ट्वीट केलाय. लिहिलंय, लक्ष्य तक पहुंचने से पहले सफ़र में मज़ा आता है. ५ नोव्हेंबरला ते म्हणतात, सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं.

६ नोव्हेंबरला त्यांनी लिहिलं, जो लोग कुछ भी नहीं करते, वे कमाल करते है आणि ७ ला ते पुन्हा एकदा दुष्यंतकुमार यांचा आधार घेत भाजपाला स्पष्टपणे बजावतात की तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं. ‌

 

राज असरोंडकर

लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक प्रमुख आहेत.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!