सामाजिक कार्यकर्तीची अश्लील बदनामी केल्यावरून होमगार्डविरोधात माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

सामाजिक कार्यकर्तीची अश्लील बदनामी केल्यावरून होमगार्डविरोधात माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

सामाजिक कार्यकर्तीची अश्लील बदनामी केल्यावरून होमगार्डविरोधात माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

माजलगाव येथील दारुबंदीसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या तक्रारीवरून वाशिम येथील चार होमगार्डविरोधात माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अमोल सुरोशे, सतिश घुले, विजय गायकवाड आणि सुनील जाधव अशी आरोपींची नावे असून होमगार्डसच्याच विदर्भ होमगार्ड सैनिक या एका वाॅटस्एप समुहात आरोपींनी सौंदरमल यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषेत मजकूर लिहिला होता. सदरचा मजकूर म्हणजे अप्रत्यक्षरीत्या बलात्काराच्याच धमक्या होता.

सत्यभामा सौंदरमल यांनी नुकतंच माजलगाव येथील विलगीकरण कक्षात दारू पुरवठा होत असून, या गैरप्रकारात होमगार्डस् सामील असल्याचं उघडकीस आणलं होतं. सदरच्या विलिनीकरण केंद्रात होमगार्डस् बंदोबस्ताला आहेत. त्यांचा फायदा उठवत काही होमगार्डस्नी एकत्र येत सौंदरमल समस्त होमगार्डस्ची बदनामी करत असल्याची हाकाटी पिटली होती.

वास्तविक मी फक्त गैरप्रकारात सामील लोकांच्याच विरोधात आहे, सगळ्या होमगार्डच्या नाही, असा खुलासाही सत्यभामा सौंदरमल यांनी केला होता.

तरीही, माजलगाव केंद्रात बंदोबस्तावरील होमगार्डला हाताशी धरून सत्यभामा सौंदरमल यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. २५ एप्रिलच्या विडियोचे संदर्भ घेऊन माजलगाव पोलिसांनीही संशयास्पद तत्परता दाखवून ४ मे ला गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सत्यभामा यांचा मोबाईलही जप्त केलाय. दरम्यान, काही होमगार्डसनी सत्यभामा यांच्याविरोधात वाॅटस्एप आपल्या समुहात बदनामीची मोहिमच सुरू केली होती.

आज सदर मजकुराचे स्क्रीनशाॅटस् घेऊन सत्यभामा यांनी माजलगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, पोलिसांनी भादंवि ३५४, ५०० नुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

आता राज्याचं गृहखातं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या होमगार्डस्विरोधात काय कारवाई करतं, याकडे आपलं लक्ष असल्याचं कारण काही मोजक्या नतद्रष्ट लोकांमुळे सगळेच बदनाम होऊ नयेत, असं आपलं मत असल्याचं सत्यभामा यांनी म्हटलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!