सत्यशोधक चेतना पुरस्काराने पत्रकार सचिन परब आणि जुलेखा शेख यांचा होणार सन्मान ; इरफान इंजिनिअर, सुबोध मोरे, डॉ. हुबनाथ पांड्येय आणि सरफराज अहमद यांची उपस्थिती !

सत्यशोधक चेतना पुरस्काराने पत्रकार सचिन परब आणि जुलेखा शेख यांचा होणार सन्मान ; इरफान इंजिनिअर, सुबोध मोरे, डॉ. हुबनाथ पांड्येय आणि सरफराज अहमद यांची उपस्थिती !

सत्यशोधक चेतना पुरस्काराने पत्रकार सचिन परब आणि जुलेखा शेख यांचा होणार सन्मान ; इरफान इंजिनिअर, सुबोध मोरे, डॉ. हुबनाथ पांड्येय आणि सरफराज अहमद यांची उपस्थिती !

सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन संस्थेचा २०२० चा 'सत्यशोधक चेतना पुरस्कार' संगमनेर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जुलेखा शेख तर यंदाचा 'सत्यशोधक चेतना पुरस्कार' महाराष्ट्रातील आघाडीचे तरुण पत्रकार सचिन परब यांना जाहिर करण्यात आला आहे.

मुंबईत ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता परळ येथील आर एम भट हायस्कूलमध्ये आयोजित समारंभात इरफान इंजिनिअर, डॉ. हुबनाथ पांड्येय आणि सरफराज अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष प्रतिमा जोशी व सेक्रेटरी अंकुश कदम यांनी कळवलं आहे. काॅ. सुबोध मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात 'आधुनिक भारत की गंगा-जमनी तहेजीब' या विषयावर चर्चा होणार आहे.

दिवंगत मनोहर कदम हे इतिहास संशोधक, कथाकार व प्रागतिक चळवळीतील जीवनदानी कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ४ डिसेंबर हा त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनी सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन संस्थेच्या वतीने मुंबईत दरवर्षी 'सत्यशोधक प्रबोधन जागर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमात दरवर्षी कार्यकर्ता किंवा संशोधक अभ्यासक यांना ; सत्यशोधक चेतना पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येते. कोविड १९ महामारीमुळे मागील वर्षी पुरस्कार वितरण करण्यात आले नव्हते. यावर्षी दोन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

यंदा मनोहर कदम स्मृती प्रबोधन जागर मुंबईत ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात सत्यशोधक चेतना पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रु. ११००० रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, अशी माहिती प्रतिमा जोशी यांनी दिली.

'सत्यशोधक चेतना पुरस्कार २०२०' ने सन्मानित करण्यात येणा-या जुलेखा शेख या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. गेली दीड दशक त्या कौटुंबिक हिंसाचार विरोधी लढ्यात अग्रेसर आहेत. परितक्त्या, विधवा, निराधार स्त्रियांच्या प्रश्नावर संघटीपणे काम करीत आहेत. संगमनेर तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीत त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत.

यंदाच्या 'सत्यशोधक चेतना पुरस्कारा'ने सचिन परब यांना सन्मानित करण्यात येत आहे. सचिन परब हे महाराष्ट्रातील आघाडीचे तरुण पत्रकार म्हणून परिचित असून जवळपास २५ वर्षे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केलं आहे. गोवादूत, नवशक्ती आदी दैनिकाचे संपादकही ते राहिले आहेत.

सद्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात लक्षवेधी ठरलेल्या 'रिंगण' संतपरंपरेचा सामाजिक व सांस्कृतिक मागोवा घेणा-या आषाढी एकादशी वार्षिक विशेषांकाचे तसेच 'कोलाज डॉट इन' या वेबसाईटचे ते संपादक आहेत.

अलिकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेल्या 'प्रबोधनमधील प्रबोधनकार या प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील लेखांचे त्रिखंडी संपा त्यांनी केलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!