महाराष्ट्रात शाळा सुरू झालेल्या नाहीत !

महाराष्ट्रात शाळा सुरू झालेल्या नाहीत !

महाराष्ट्रात शाळा सुरू झालेल्या नाहीत !

आज शाळा सुरू होणार नाहीयेत. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना रात्री।उशिरा कळवल्याचं शिक्षक भारतीने म्हटलं आहे.

शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नसून वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आमदार कपिल पाटील यांना सांगितलं असल्याची माहिती शिक्षक भारतीने दिली आहे.

शाळा उद्या सुरू करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आमदार कपिल पाटील यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षण आयुक्त रात्री उशिरापर्यंत याबद्दलचे आदेश काढत आहेत.

शिक्षण आयुक्त यांनी फोनवरून कपिल पाटील यांना सांगितले की, आदेश आलेले आहेत. आम्ही कळवत आहोत.

शिक्षक भारती,महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी सदरबाबतचा संदेश प्रसारित केला आहे. आमदार कपिल पाटील यांनी सदर माहितीला पुष्टी दिली आहे. आमदार पाटील यांनी “मिडिया भारत”ला सांगितलं की संबंधितांना रात्रीच वाॅटस्एपवरून आदेश गेलेले आहेत.

News by Mangesh Asrondkar

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!