आमच्या सर्कशीला विदुषक हवाय ; शरद पवारांचा राजनाथ सिंहावर पलटवार !

आमच्या सर्कशीला विदुषक हवाय ; शरद पवारांचा राजनाथ सिंहावर पलटवार !

आमच्या सर्कशीला विदुषक हवाय ; शरद पवारांचा राजनाथ सिंहावर पलटवार !

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना महाराष्ट्रातील कारभारावर टिका करतांना सत्ताधारी महाविकास आघाडीला सर्कस संबोधले होते. याचा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत राजनाथ सिंह यांना प्रतिटोला हाणला आहे.

आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, पण, विदुषकाची मात्र कमतरता आहे, अशा शब्दांत पवारांनी राजनाथ सिंहांची फिरकी घेतली.

कोकणातील निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांच्या पाहणी दौऱ्यावर असतांंना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी व्यवस्थित स्थिती सांभाळतेय इथे लक्ष घालण्यापेक्षा मध्य प्रदेश, गुजरातमध्ये सर्कशी सुरू आहेत, तिथे केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष घालावे, असा सल्ला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.

News by Praful Kedare

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!