दिवाळीत पाणीपुरवठ्यात व्यत्यय नको ; सभापती अंजली साळवे यांचे निर्देश !!

दिवाळीत पाणीपुरवठ्यात व्यत्यय नको ; सभापती अंजली साळवे यांचे निर्देश !!

दिवाळीत पाणीपुरवठ्यात व्यत्यय नको ; सभापती अंजली साळवे यांचे निर्देश !!

दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या सभापती अंजली साळवे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेऊन, सणासुदीच्या काळात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येता कामा नये तसंच कोणत्याही प्रकारचे शट डाऊन घेण्यात येऊ नये व सदर बाबत औद्योगिक महामंडळाला सुचित करण्यात यावे, असे निर्देश दिले.

उपायुक्त तुषार सोनावणे, पाणी पुरवठा अधिकारी बी.एस. पाटील , अभियंता रहेजा , अभियंता वानखेडे , अभियंता अश्विनी आहुजा, नगरसेविका ज्योत्स्ना जाधव, माजी नगरसेवक सुरेश जाधव , काँग्रेस महासचिव रोहित साळवे , ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके या बैठकीत उपस्थित होते.

दिवाळी सण लक्षात घेता शटडाऊन घेण्यात येऊ नये, पाणी पुरवठा ठरलेल्या वेळांत सुरळीतपणे करण्यात यावा, बंद पडलेले बोअरवेल व टाक्या यांची यादी तयार करून तात्काळ सुरू करण्यात याव्यात, पाणी गळती व दुरुस्तीची कामे तातडीने करावीत, नगरसेवकांना पाणी पुरवठ्याची वेळ नियमितरित्या कळवण्यासाठी प्रभाग अधिकारींमार्फत यांच्या मार्फत वॉटसृएप समूह बनवून सद्यस्थितीबाबत माहिती पुरवण्यात यावी, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रभागक्षेत्रातील सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात येऊन, ठोस धोरण ठरवून आपण महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं सभापती अंजली साळवे यांनी ‘मिडिया भारत न्यूज’ ला सांगितलं.

फटाक्यांचा वापर टाळून प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करूया, असं आवाहनही साळवे यांनी केलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!