जागरणाने माणसाचा वृद्ध होण्याचा वेग वाढतो !

जागरणाने माणसाचा वृद्ध होण्याचा वेग वाढतो !

जागरणाने माणसाचा वृद्ध होण्याचा वेग वाढतो !

अंधार पडू लागल्यावर आपल्या पीनियल ग्रंथीमधून मेलॅटोनीन या हॉर्मोनचे स्रवण सुरु होते, ज्याने झोप येऊ लागते. मात्र उजेड दिसला की त्याचे स्रवण बंद होते. त्यामुळे रात्री बाथरूममध्ये अत्यंत मंद पॉवरचा दिवा लावावा. प्रखर दिव्याने झोप उडण्याचा अनुभव अनेकांना असेल. झोपताना आसपास जितका काळोख करता येईल तितका करावा.

झोपण्याच्या एक तास आधी सर्व स्क्रीन्स कडे पाहणे बंद करावे (टीव्ही, कॉम्प्युटर, फोन): यानेही मेलॅटोनीन स्रवणाची हानी होते.
मेलॅटोनीन हे शरीरातर्फे निसर्गतः रात्री १२ ते ३ या काळात स्रवले जाते. या काळात उजेड, जागरण नक्की टाळावे.

गरज असल्यास मेलॅटोनिनची गोळीही घेता येते. मेलॅटोनीन हे नैसर्गिक संयुग आहे. ते शरीराला "परके" नाही. मेलॅटोनीन हे अँटी-ऑक्सिडंटही असते आणि त्यामुळे ते पेशींची हानी कमी करण्यास उत्तम मदत करते.

(२४ तास प्रखर उजेडाखाली ठेवलेल्या उंदरांमध्ये सुमारे १२टक्के उंदरांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे. २४ तासातील झोप आणि जागृतावस्थेचे नैसर्गिक चक्र बिघडल्याचा हा परिणाम मानला जातो. )

 

 

 

मिलिंद पदकी

वैदकीय आणि औषधविषयक लेखक
यांच्या फेसबुकवरून साभार
https://www.facebook.com/milind.padki

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!