तुमच्या नकळत स्मार्ट हेल्मेट मोजतंय तुमचा ताप !

तुमच्या नकळत स्मार्ट हेल्मेट मोजतंय तुमचा ताप !

तुमच्या नकळत स्मार्ट हेल्मेट मोजतंय तुमचा ताप !

टेक्नॉलॉजीच्या पावलावर पाऊल ठेवत जग आता प्रगत होत आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्मार्ट हेल्मेट कोरोना रूग्णाचं एक महत्वाचं प्राथमिक लक्षण म्हणजे ताप सामान्यतः तापाची मोजणी थर्मल गनच्या माध्यमातून केली जाते, परंतु आता व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी “स्मार्ट हेल्मेट” या यंत्राचा जगभरात उपयोग केला जात आहे.

हे स्मार्ट हेल्मेट केसी वेअरेबल (KC Wearable) ही चिनी कंपनी तयार करते. स्मार्ट हेल्मेटच्या मध्यभागी कॅमेरा तसंच सेन्सर बसवलेले असतात. त्याद्वारे ११ फुटांवरूनही एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान सहज मापलं जाऊ शकतं. क्यूआर कोड, मोबाइल आपलिकेशनशी स्मार्ट हेल्मेट जोडलेले असते. या हेल्मेटच्या माध्यमातून एका मिनिटात २०० तर तासाभरात १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची स्कॅनिंग करता येऊ शकते. यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोना संशयित रुग्णाला शोधून कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा बसण्यास मदत होऊ शकते.

२०१९ च्या डिसेंबरात चीनमधून कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू झाला. वुहान या शहरात सर्वप्रथम कोरोना रुग्ण आढळला. पुढे जानेवारी-फेब्रुवारीत जगभर वेगाने कोविड आजार पसरू लागल्यानंतर साधारणतः मार्च महिन्यात वुहान पोलिस दलाने कोरोनाबाधित रुग्ण सोधण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर केला आणि याच यंत्रणेमुळे वुहानमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यास तेथील पोलिस दलाला आणि प्रशासनाला यश आलं.

एप्रिल महिन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) पोलिस दलाने याच यंत्रणेचा वापर करून कोरोना प्रसार रोखण्यात सफलता मिळवली. साधारण ६ लाख रुपये किंमत असलेल्या या स्मार्ट हेल्मेटला सद्या जगभरात मोठी मागणी आहे. भारतात आगमन होण्यापूर्वी स्मार्ट हेल्मेट्सचा वापर इंडीनेशिया, रशिया, चीन, इटली, संयुक्त अरब अमिराती, अमेरिकेत ताप मोजण्यासाठी झालाय.

स्मार्ट हेल्मेट या प्रगत टेक्नॉलॉनीने सुसज्ज थर्मोस्कॅनरच्या मदतीने दाट लोकवस्तीच्या, झोपडपट्ट्यांच्या तसंच गर्दीच्या परिसरातील लोकांचं शरीराचं तापमान त्यांच्या नकळत तपासणं शक्य होणार आहे. थर्मो गनच्या तुलनेत ही स्मार्ट हेल्मेट्स अधिक वेगाने तापमान मोजण्यास मदत करत आहे.

भारतातसुद्धा “भारतीय जैन संघटना” (BJS) या सेवाभावी संस्थेने कोविडरुग्ण शोधण्यासाठी स्मार्ट हेल्मेट उपलब्ध करून दिले आहेत. देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ मुंबई आणि पुणे शहरात आता “स्मार्ट हेल्मेट” या पोर्टेबल थर्मोस्कॅनरच्या मदतीने लोकांचं तापमान पाहिलं जात आहे. मुंबई, पुणे शहरात कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असताना तिथलं पालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जून-जुलै महिन्यात स्क्रिनिंगसाठी या हाय टेक यंत्रांचा वापर करत होते.

आता त्याच हायटेक स्मार्ट हेल्मेट चा वापर “नाशिक” मध्येसुद्धा सुरू झालाय. भारतीय जैन संघटनेच्या स्वयंसेवकांनी, पीपीई सूट घालून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत, या हेल्मेटद्वारे ग्राहकांचं स्कॅनिंग करताहेत. नागरिकांचं तापमान शंभराच्या आसपास आढळून आल्यावर त्यांचं नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आदी माहिती लिहून घेण्यात येत आहे.

जगभरात करोनाविषाणूने थैमान घातल्यानंतर पहिल्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचा आता दुसरा नंबर कोरोनाबाधित देशांमध्ये येतो. कोणत्याही प्रकारची लस बाजारात उपलब्ध नाही की कोविड-१९ आजारावर थेट उपचार नाहीत. माणसामध्ये असलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे या आजारावर मनुष्यप्राणी मात करू शकतो, परंतु विविध अफवांमुळे लोकांमध्ये चाचणीबाबत उदासीनता आहे. मात्र आता आधुनिक स्मार्ट हेल्मेट शरीराचं तापमान व्यक्तीला न समजता मोजण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या व दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मोठ्या प्रमाणात या स्मार्ट हेल्मेटचा वापर होणं आवश्यक आहे.

 

कपिल खंडागळे

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी ; कायद्याने वागा लोकचळवळीचा विद्यार्थी समन्वयकमिडिया भारत न्यूज च्या युट्यूब चॅनलवर जाण्यासाठी इथे क्लिक करा :

https://www.youtube.com/channel/UCPSaM5VGRfQ0OALxe2-yWgw

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!