देवरूखला स्नेहपरिवाराचा संक्रांती महोत्सव आणि ग्राहक पेठ !

देवरूखला स्नेहपरिवाराचा संक्रांती महोत्सव आणि ग्राहक पेठ !

देवरूखला स्नेहपरिवाराचा संक्रांती महोत्सव आणि ग्राहक पेठ !

आपण कितीही लाॅकडाऊन पाळतो, असं म्हटलं तरी आपापल्या परीने प्रत्येकाने या काळात आपला उद्योग नियम पाळून सुरू ठेवला आहेच. हे प्रकर्षाने जाणवायचं कारण म्हणजे देवरूखच्या स्नेहपरिवारने आयोजित केलेल्या १४ ते १७ जानेवारी या देवरूख मधील प्रदर्शनाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद.

देवरूख आणि आसपासच्या भागातीलच नाहीतर पार…. लातूर, अलिबाग, कोल्हापूर इथून लघु आणि गृहउद्योजकांनी स्टाॅल बुक केले आहेत. दागिने, विविध प्रकारचे कपडे, मसाले, शैक्षणिक आणि गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, शेती पूरक उत्पादने, लातूरहून सोयाबीन खाऊ उत्पादक, लोकरीचे पोशाख, सॅनिटरी पॅडस्,अलिबागहून नक्षीदार आकर्षक कुर्ते, सुवासिक उदबत्त्या, नाविन्यपूर्ण हर्बल वाती, लोकरीचे पोशाख, पापड कुरडया,चटण्या, लोणची ,वेफर्स किंवा चिप्स आणि वेगवेगळी आनंददायी चॉकलेट्स अशी अनेक उत्पादनं या ठिकाणी खरेदी करता येतील.

साधारण 40 स्टाॅल असतील इथे..आणि एवढे स्टाॅल बघत बघत फिरताना पोटपुजेसाठी खास जळगावची कळण्याची भाकरी, वांग्याचं भरीत, शेवभाजी, मूगभजी, रोस्टेड मिरची, कुरकुरीत साबुदाणा वडे, ओल्या बिबड्या अशा अनवट पदार्थांचाही चवबदल म्हणून आस्वाद घेता येईल.

इथे येऊन फक्त खा,प्या, खरेदी करा एवढाच या महोत्सवाचा उद्देश नसून प्रदर्शनाला जोडूनच सर्वांसाठी स्नेहपरिवारने पुण्याच्या नेत्रतज्ञांच्या सहकार्याने ठराविक वेळात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी डोळे तपासणी व डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल.

अशा प्रदर्शनांच्या निमित्ताने आपल्याला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काय होतंय, तिथली मंडळी काय नवीन करतायंत आणि आपलं गाव सोडून इथपर्यंत आपल्यासमोर काय सादर करतायंत हे पहाणं, त्याचं कौतुक करून त्याला उत्तेजन देणं ,जमल्यास काही शिकणं असं उद्योग पर्यटनही शक्य होतं आणि म्हणूनच येणाऱ्या मंडळींचं स्वागत करण्यासाठी आपणही १४ ते १७ जानेवारी दरम्यान या संक्रांती महोत्सवाला भेट द्यायला हवी…!! तसं रीतसर निमंत्रणच स्नेहपरिवारच्या रूबीना चव्हाण यांनी केलंय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!