फुलपाखरं छान किती दिसती ! माथेरानमध्ये सापडलेल्या निसर्गाच्या आणखी रंगबिरंगी कलाकृती !!

फुलपाखरं छान किती दिसती ! माथेरानमध्ये सापडलेल्या निसर्गाच्या आणखी रंगबिरंगी कलाकृती !!

फुलपाखरं छान किती दिसती ! माथेरानमध्ये सापडलेल्या निसर्गाच्या आणखी रंगबिरंगी कलाकृती !!

आताच्या परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असताना कित्येक तरी जंगलं उध्वस्त होत आहेत. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी पर्यावरणाची हानी होत आहे आणि यातूनच अनेक प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जाती समूळ नष्ट होण्याची चिन्हं समोर दिसत आहेत; त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती चिंता व्यक्त करताना दिसतो. परंतू, जगात असेही काही लोक आहेत जे निसर्गावर अतोनात प्रेम करतात आणि निसर्गातील जे वैविध्य आहे ते सतत टिपत असतात.

मुंबईपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेले “माथेरान” हे ठिकाण तेथील वनराई, विविध प्रजातीच्या वनस्पती आणि एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या लौकिकपूर्ण असलेल्या माथेरानचं अजून एक वैविध्य समोर आलंय. माथेरानमध्ये फुलपाखरांच्या नव्या ७७ प्रजाती आढळून आल्या आहेत.

“मुंबई निसर्ग संशोधन संस्थातील” (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) संशोधक मंदार सावंत, डॉ. निखिल मोडक आणि सोमय्या महाविद्यालयातील सागर सारंग या तिघांनी ८ वर्षाच्या कालावधीत माथेरानमधील फुलपाखरांचा अभ्यास करून त्यावर हे संशोधन केले आहे.

जवळपास १२५ वर्षांनंतर एशियामधील एकमेव चालण्यायोग्य हिल स्टेशनवरील फुलपाखरांची ही पहिली चेकलिस्ट आहे.

यापूर्वी ब्रिटीश संशोधक जे. ए. बेथम यांनी १८९४-९५ मध्ये ८७ फुलपाखरूच्या प्रजातींचे संसोधन सादर केले होते. आताच्या संशोधनानुसार माथेरानमधील फुलपाखरांच्या जातींची संख्या आता १४० झाली आहे. हे संशोधन बुल्गारियाच्या बायोडायव्हर्सिटी डेटा जर्नल (BDJ) Finding the Forgotten Gems या शोधनिबंधात प्रकाशित करण्यात आले आहे.

फुलपाखरू हे ठराविक ऋतुंमध्येच आढळतात आणि ठरावीक ऋतुंमध्ये त्यांचे विशिष्ट कार्य करत असतात आणि हेच बघण्यासाठी या तिघांनी काही रंगांचे कोड तयार केले. फुलपाखरांसाठी असे रंगांचे कोड तयार करणारे हे पहिले संशोधक आहेत. त्यासाठी यांनी १५ रंग वापरले.

आढळलेल्या १४० प्रजाती या सहा कुटुंबातील आहेत. या यादीत डबल ब्रँडेड क्रॉ,  plain banded awl, large , orange-tailed awlet, common sergeant and plain puffin अशी फुलपाखरे संशोधनातून आढळून आली आहेत. यावरून माथेरानमधील निसर्गसंपदा खूपच वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सिद्ध होते, असे मंदार सावंत यांनी म्हटले आहे.

 


कपिल खंडागळे

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयात पदवीचा विद्यार्थी. कायद्याने वागा लोकचळवळीचा विद्यार्थी प्रतिनिधी

MediaBharatNews

Related Posts
comments
  • Congratulations 💐💐 mandar savant and team

  • खूपच छान , अतिशय सुंदर अशा कलाकृती आहेत ….खूप छान कपिल….👌👌👌

  • leave a comment

    Create Account    Log In Your Account    Don`t copy text!