मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोविड सेंटर मधील महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक प्रणाली जारी केलेली असली तरी त्यात नमूद सूचनांचं पालन करण्याबाबत कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. ती ढोबळ आहे आणि शासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केलीय, असा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मिडिया भारत न्यूज शी बोलताना केलाय.
कोविड सेंटरमधील महिला सुरक्षेबाबत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णया गंभीर त्रूटी असून, आदेशांचं पालन करण्यात कसूर झाली किंवा महिला सुरक्षेबाबत हयगय झाली तर त्याला जबाबदार कोण असेल, याबाबत निर्णयात काही म्हटलेलं नाही, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलंय.
महिलांनी तक्रार करण्याची तरतूद करण्यात आली आहे, परंतु तक्रार समितीत कोण असणार, तक्रार निवारणाची पद्धत काय असेल आणि तक्रार निवारण नेमकं कोण करणार, तक्रार प्रशासकीय पातळीवर हाताळली जाईल की फौजदारी पातळीवर, याबद्दलही काही उल्लेख नाही ! असा चित्रा वाघ यांचा आक्षेप आहे.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात कोविड सेंटरमध्ये सोळा विनयभंगाची आणि चार बलात्काराची प्रकरणे झालेली आहेत. आम्ही सातत्याने महिला सुरक्षेच्या संदर्भात मार्गदर्शक प्रणाली जारी करण्याबाबत वर्षभरापासून बोलत आहोत, परंतु शासनाने दुर्लक्ष केलं. आता जी मार्गदर्शक मार्गदर्शक प्रणाली जारी करण्यात आली आहे, तिच्यात नेमकी जबाबदारी निश्चित करण्यात न आल्याने तीसुद्धा ढोबळ ठरणार आहे, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय.