शिवसेना-भाजपातल्या वैमनस्याची झळ कुटुंबियांना ! आमदाराकडून भावजयीला बेदम मारहाण !!

शिवसेना-भाजपातल्या वैमनस्याची झळ कुटुंबियांना ! आमदाराकडून भावजयीला बेदम मारहाण !!

शिवसेना-भाजपातल्या वैमनस्याची झळ कुटुंबियांना ! आमदाराकडून भावजयीला बेदम मारहाण !!

शिवसेना-भाजपातील राजकीय वैमनस्य आता त्या पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या घरादारापर्यंत पोचलंय ; यांची झलक औरंगाबादमध्ये पाहायला मिळालीय. भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली, म्हणून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्या भावजयीलाच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. राज्य महिला आयोगाने तातडीने पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवून घेतलाय.

औरंगाबाद शहरातील गोदावरी कॉलनीतील या घटनेप्रकरणी आमदारासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाना, ता. वैजापूर) यांच्या फिर्यादीवरून, आमदार रमेश नानासाहेब बोरनारे, पत्नी संगीता रमेश बोरनारे, संजय नानासाहेब बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजित मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, दिनेश शाहू बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

जयश्री बोरनारे व त्यांचे पती दिलीप बोरनारे शुक्रवारी दुपारी एका वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी शहरातील गोदावरी कॉलनीत आले होते. त्यावेळी दिलीप यांचे चुलतभाऊ आमदार रमेश बोरनारे त्यांनी पत्नीसह इतर आठ लोकांनी मिळून जयश्री व दिलीप यांना घरातून बाहेर बोलावून तुम्ही भाजपच्या कार्यक्रमात जाऊन आमची बदनामी करत आहात, असे म्हणत मारहाण केल्याचा जयश्री बोरनारे यांचा आरोप आहे.

भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जयश्री बोरनारे यांनी केवळ हजेरी लावली नव्हती, तर त्यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व माजी नगराध्यक्ष दिलीप परदेशी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केलं होतं. त्याचा राग आमदार रमेश बोरनारे यांच्या मनात होता.

सदर घटनेबाबत पोलिसांनी काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाने मागवला असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवर दिली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!